नागपूर : जिल्ह्यात रेशनच्या धान्याची काळाबाजारी जोरात सुरू आहे. यात रेशन वाटप करणारे दुकानदार, अधिकारी यांची मिलीभगत आहे. रेशनचे धान्य वाटप बहुतेक राजकीय नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळं रेशनचं धान्य खुलेआम बाजारात जात आहे. याला आवर कोण घालणार? मनपाचा स्टेशन घोटाळा उघडकीस आला. नेते जोराजोराने अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढू लागले. आता रेशन घोटाळा कोण उघडकीस आणणार असा प्रश्न विचारला जात आहे.
नागपुरात रेशनची काळाबाजारी होत असल्याची घटना पुन्हा एकदा समोर आली. कळमना पोलिसांनी कारवाई करत जवळपास 8 लाख रुपयांचे धान्य जप्त करत दोन आरोपीना अटक करण्यात नागपुरात गरिबांच्या रेशन धान्याची काळाबाजारी वाढत आहे. पोलिसांच्या करवाईतून ही बाब पुढे आली. कळमना पोलीस रात्रीची पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका चार चाकी गाडीतून धान्य नेलं जात असल्याचे दिसून आलं. पोलिसांनी चौकशी केली असता रेशन धान्य हे वेगळ्या पोत्यामध्ये भरून त्याचं वहन होत होत. त्यांच्याकडे कुठलीही कागदपत्र नव्हते. जेव्हा विचारपूस केली असता हा माल बुट्टीबोरीच्या सार्वजनिक वितरण पणालीच्या दुकानातून आल्याचं स्पष्ट झालं.
पोलिसांनी बुट्टीबोरीमधील त्या दुकानात छापा मारला असता त्या ठिकाणी आणखी काही पोती काळाबाजारासाठी जाण्याच्या तयारीत होते. त्यावरून ही कारवाई करत दोन आरोपींना अटक करण्यात आली. जवळपास 8 लाख रुपये किमतीचे गहू आणि तांदूळ जप्त करण्यात आले. अन्न वितरण विभागाला याची सूचना देण्यात आली असल्याची माहिती कळमनाचे पोलीस निरीक्षक बी. एस. नरके यांनी दिली. रेशनच्या दुकानात मिळत असलेलं हे धान्य गरिबांना कमी किमतीत मिळणार असतं. यावर अनेक गरिबांचं घर चालतं. मात्र दुकानदार किंवा दलाल मात्र हे बाहेर मार्केटमध्ये विकून गरिबांवर अन्याय केला जातो, याची पाळंमुळं शोधून काढण्याची गरज आहे.