नागपूर : येथील राघव भांगडे या 7 वर्षीय चिमुकल्याने चक्रासन करीत एक नवा विक्रम स्थापन केला आहे. राघवने 1 मिनीट 13 सेकंदात चक्रासन करीत 102 पायऱ्या खाली उतरला. दिवसाला चार तास सराव करीत रविवारी राघवने चक्रासनाचा हा विक्रम केला.
योगासनांमध्ये चक्रासन हा प्रकार कठीण मानला जातो. त्यातही चक्रासन अवस्थेत पायऱ्या उतरणे याला मोठे कौशल्य लागते. मात्र नागपूरच्या राघव भांगडे या सात वर्षीय चिमुकल्याने या कठीण योगासनाचा अभ्यास करीत रविवारी विक्रम स्थापन केला. नागपूरच्या बाजीप्रभूनगर येथे राहणाऱ्या राघवने इमारतीच्या पाचव्या माळ्यावरून चक्रासन अवस्थेत तळमजल्यापर्यंत खाली उतरला. 1 मिनीट 13 सेकंदात राघवने 102 पायऱ्या खाली उतरून हा विक्रम केला.
राघवच्या या विक्रमाचे साक्षीदार राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह आमदार विकास ठाकरे हे देखील झाले. यापूर्वी अशा प्रकारचा कुठलाही विक्रम नव्हता. त्यामुळं राघवचा हा विक्रम नागपूर करांसाठी उत्सुकतेचा विषय होता. राघवच्या या विक्रमाचे साक्षीदार राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यासह आमदार विकास ठाकरे हे देखील झाले.
राघवच्या या विक्रमाची नोंद इंडिया बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय. शहरातील नागपूर पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, आंतराष्ट्रीय योगा खेळाडू धनश्री लेकुरवाळे उपस्थित होते. राघवचे सर्व पाहुण्यांनी सत्कार करून अभिंनदन करण्यात आले. राघवला विजय घीजरे यांनी प्रशिक्षण दिले आहे.
सुरुवातीपासूनच राघव हा चंचल असल्याचे राघवचे कुटुंबीय सांगतात. त्याच्या या चंचलपणामुळे त्याला कराटेच्या कोचिंगला टाकले. पाच वर्षाचा असताना एका मिनिटात 125 टाईल्स हाताने फोडण्याचा विक्रमही राघवच्या नावावर आहे. त्यामुळं राघवकडं नागपूरच्या क्रीडाक्षेत्रात आशेचा किरण म्हणून पाहीलं जातंय.