नागपूर : दिवसा सायकल रिक्षा घेऊन रेकी करायची… संध्याकाळ झाली की पागलाच रूप धारण करायचं… चोरी करण्याच्या ठिकाणी थांबायचं… आणि संधी मिळताच बंद दुकानात घुसून चोरी करायची… अश्या हुशार चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात सक्करदरा पोलिसांना यश आलंय. त्याच्याकडून चोरीचे साहित्य आणि दीड लाख रुपये सुद्धा जप्त करण्यात आले.
हा आरोपी आधी पुणे, नाशिक, चंद्रपूर अश्या वेगवेगळ्या शहरात चोरी करायचा. चोरी केल्यानंतर तो दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हायचा. त्यामुळं तो काही पोलिसांच्या हातात येत नव्हता. या आरोपीनं नंतर आपला मोर्चा नागपूरकडे वळविला. नागपुरातही त्यानं 3 ठिकाणी चोऱ्या केल्या. मात्र पोलिसांच्या हाती लागला आणि जेलमध्ये पोहोचला.
नंदू परदेशी आत्राम असं या आरोपीचं नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील रहिवासी आहे. मात्र त्याच कार्यक्षेत्र मोठं आहे. तो चोरी करताना एकटाच राहायचा. दिवसभर सायकल रिक्षा घेऊन एखादं दुकान शोधायचं. त्याचा दिवसभर अभ्यास झाला की, त्याचं दुकानासमोर संध्याकाळी पागल बनून बसायचं. रात्री त्याच दुकानात चोरी करायची. अशी त्याची अनोखी पद्धत होती. याच पद्धतीनं त्यानं अनेक शहरात चोरी केल्या.
मात्र नागपुरात त्याचे फासे 3 चोऱ्या केल्यानंतर उलटे पडले आणि पोलिसांच्या हाती लागला, असल्याची माहिती सक्करदऱ्याचे पोलीस निरीक्षक धनराज पाटील यांनी दिली. चोरीची पद्धत त्याची वेगळी होती. अनेक ठिकाणी तो वाचला. मात्र त्याची हुशारी नागपूर पोलिसांच्या समोर चालली नाही आणि जेलमध्ये पोहचला…