RSS Chief Mohan Bhagwat : ओटीटीवरील अश्लील कार्यक्रमांना घाला लगाम, सरसंघचालकांनी केंद्राचे टोचले असे कान 

| Updated on: Oct 12, 2024 | 11:36 AM

RSS Chief Mohan Bhagwat on OTT : नागपूर येथील विजयादशमी उत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेक मुद्दांवर सरकारचे कान टोचले. त्यांनी बांगलादेशातील आणि जगभरातील हिंदूच्या हक्क रक्षणासाठी केंद्र सरकारला पवित्रा घेण्याचे आवाहन केले. तर फोफावलेल्या अश्लिलतेवर सुद्धा प्रहार केला.

RSS Chief Mohan Bhagwat : ओटीटीवरील अश्लील कार्यक्रमांना घाला लगाम, सरसंघचालकांनी केंद्राचे टोचले असे कान 
सरसंघचालकांनी टोचले केंद्र सरकारचे कान
Follow us on

विजयादशमी उत्सवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू जागर केला. बांगलादेश, पाकिस्तानच नाही तर जगभरातील हिंदूंच्या हक्क रक्षणासाठी केंद्र सरकारने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. नागपूर येथे विजयादशमी उत्सवात त्यांनी अनेक मुद्यांवर सरकारचे कान धरले. त्यांनी सरकार आणि हिंदूंना दुर्बलता हा अपराध असल्याचे थेट आवाहन केले. त्यांनी अत्याचार सहन न करण्याचे आवाहन केले. तर त्याचवेळी सरसंघचालकांनी प्रामुख्याने ओटीटीच्या माध्यमातून फोफावत असलेल्या अश्लिलतेवर त्यांनी प्रहार केला.

समाजात विकृती पसरवण्याचा प्रयत्न

बांगलादेशात चर्चा आहे. भारत आपला शत्रू आहे. पाकिस्तान आपला मित्र आहे. अशी चर्चा तिथे आहे. असे नॅरेशन होत आहे. बांगलादेशात जे घडलं तसं घडण्यासाठी भारतात होण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. संस्थांना कब्तात घ्यायचं, विद्यापीठ, शिक्षण संस्था, माध्यम या द्वारे समाजात विचारांची विकृती पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप सरसंघचालकांनी केला. आपणंच आपल्या लोकांना शिव्या देण्याचं वातावरण निर्माण केलं जातं आहे. लोकांना उग्र करुन, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न. यामुळे त्या देशावर बाहेरुन वर्चस्व करणं सोप होतं. कारण आता युद्ध करणं सोपं नाही, त्यामुळे हे केलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

देशात अशांतता पसरवण्यासाठी बाहेरील शक्तीला देशात मदत मिळतेय. लोकशाही पद्धतीत देशात अनेक पक्ष आहे. पर्यायी राजकारणाच्या आडून हा अजेंडा सुरु झाला आहे. भारताच्या सिमाभागात याबाबतचे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे वेळेवर आपल्याला जागं व्हायचं आहे
एका राष्ट्रीय नॅरेटीव्ह चालवायला लागेल. अभियान चालवावं लागेल. समाजाला संरक्षित ठेवण्यासाठी याची गरज आहे.

गुन्हे आणि राजकारणाचे मिलन

काही लपून राहत नाही. मीडिया सर्वत्र पोहोचला. घरा घरात मोबाईल पोहचला आहे. तरुण पिढी नशेच्या आहारी जात आहे. जो नशा करत नाही. त्याला मागास समजलं जातंय. एका सिस्टम हरण झालंय रामायण झालंय. कोलकात्यामध्ये काय झालंय. तिथे डॅाक्टरांसोबत सर्व देश उभा राहीला. सर्वत्र असं होतंय. गुन्हे आणि राजकारणाचं मिलन झाल्याने असं होत असल्याचा आरोप सरसंघचालकांनी केला.

विषमता येवढी वाढली की आपले संत आम्ही वाटले. वाल्मीत जयंती फक्त वाल्मीकी समाजातंच का व्हावी. सर्व समाजानं करावं. समाजात काय धोके आहे. याची माहिती आपल्या समाजात देणं गरजेचं आपल्या भागातील समाजाची एक समस्या आपण दूर करायला हवी. आपल्यात जी दुर्बल जाती आहे. त्यासाठी आपण काय करायचं , हे ठरवायला हवं. समाजातील वेगवेगळ्या जातीमधील लोक एकत्र बसून काम केलं. तर समाजात सद्भावना राहिल, असे ते म्हणाले. ओटीटीवर चालणाऱ्या अश्लाघ्य, अश्लिल कार्यक्रमांवर नियंत्रण आणण्यासाठी कायद्याची गरज आहे. व्यवस्थित चालायचं असेल तर मिळून चालण्याचा शास्र आहे.संविधानाची प्रस्तावना, मार्गदर्शक तत्व, मूलभूत कर्तव्य आणि अधिकार हा विचार समाजात पोहोचायला हवा. नेहमी सतर्क रहावं जेनेकरुन आचरण चांगलं राहिल, असे ते म्हणाले.