सुनील ढगे, TV9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : प्रो. साईबाबाची उच्च न्यायालयानं आठ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, साईबाबा (Prof. Saibaba) विषयीचा निर्णय हा टेक्निकल ग्राउंडवर (Technical Ground) झालेला आहे.खरं म्हणजे हा निर्णय आम्हाला धक्कादायक आहे. विशेषता जे पोलीस नक्षलवाद्यांशी लढतात. ज्यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यांच्या विरुद्ध माईंन लावून त्यांची वाहन उडवली जातात, अशा पोलिसांकरिता, त्यांच्या कुटुंबाकरिता सर्वाधिक धक्कादायक असा निकाल आहे. त्यामुळे या निकालाविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहे.
प्रो. जी. एन. साईबाबा व पाच माओवाद्यांना मे 2014 मध्ये अटक केली होती. त्यानंतर 2017 मध्ये गडचिरोली कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आज मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) साईबाबाची निर्दोष मुक्तता केली आहे.
ज्या व्यक्तीविरुद्ध एवढे पुरावे आहेत. त्याला सोडून देणे हा त्या शहिदांवर अन्याय आहे. त्यामुळे आम्ही हे सगळं सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे मांडू आणि न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.
पुणे घटनेवर फडणवीस म्हणाले, पुण्यातील मुलीला फरफटत नेण्याची घटना ही गंभीर आहे. त्यावर कारवाई केली जाईल. मात्र सगळे ऑटो रिक्षावाल्यांना दोषी मानणे योग्य होणार नाही. चूक केली असेल त्याच्यावर कारवाई होईल. अंधेरी पोटनिवडणुकीविषयी स्ट्रॅटेजी काय विचारलं असता त्यांनी ठरवू असं सांगितलं.
साईबाबा यांच्यावर देशात अराजकता माजविण्याचा तसेच गद्दारीचा आरोप ठेवला होता. कोर्टानं त्यांना दोषी ठरविलं होतं. त्याविरोधात साईबाबा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी कोर्टानं आज साईबाबा यांची निर्दोष मुक्तता केली.