नागपूर : महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा चौक कोणता? असा जर तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे… नागपुरातील ‘समृद्धीचा झिरो माईल’ (Samruddhi Mahamarg) राज्यातील सगळ्यात मोठ्या चौकासह देशातील दुसऱ्या क्रमांकाचा हा चौक आहे नागपुरात…
18 एकर क्षेत्रावर पसरलेल्या हा चौक. 70 हजार 684 चौरस मीटर क्षेत्रफळ या चौकाने व्यापलंय. 36 चौरस मीटरचं लॉन, रंगीबेरंगी झाडं अन् डोळ्यांना दिपवणारी रोषणाई… अशा अनेक वैशिष्ट्यांसह राज्यातील सगळ्यात मोठा चौक सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो…
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्गावर हा राज्यातील सर्वात मोठा चौक आहे. नागपुरात जिथून समृद्धी महामार्ग सुरु होतो, तिथे हा चौक प्रवाशांचं या महामार्गावर स्वागतासाठी सज्ज आहे.
हा चौक जितका भव्य आहे तितकंच त्याचं सुशोभिकरण खास आहे. या चौकाच्या सुशोभीकरणासाठी वापरण्यात येणारी वीज याच ठिकाणी तयार केली जाते. सोलरच्या माध्यमातून ही वीज तयार केली जाते.
महाराष्ट्र तर सोडाच पण हा देशातील दुसरा सर्वात मोठा चौक!
14 जिल्ह्यांना जोडणारा हा 701 कि.मी. लांबीचा समृद्धी महामार्ग जितका अनोखा तितकीच त्याची नागपुरातली सुरुवात देखील जबरदस्त. तब्बल 18 एकर क्षेत्रावर पसरलेल्या चौकातून हा सुसाट, समृद्धी महामार्ग सुरू होतो!#MaharashtraSamruddhi pic.twitter.com/P3AmzSv3gD— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 9, 2022
समृद्धी महामार्ग राज्यातील 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावांना जोडणार आहे. 701 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणार आहे. वाहतुक सेवा सुलभ आणि वेगवान करणारा हा महामार्ग राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी सज्ज झालाय.