मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, लवकरचं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) पक्षाच्या कामासाठी बाहेर पडणार आहेत. नागपुरात संघटनात्मक बदल करण्यासाठी त्यांच्या सूचना आहेत. विदर्भात सेना वाढवायची असेल तर नागपुरात पक्ष मजबूत करावे लागेल. आदित्य ठाकरे हेसुद्धा नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. पक्षसंघटनेच्या कामाचा आढावा घेतील. विदर्भात अनेक जिल्ह्यात संघटनात्मक बदल (organizational changes) करावे लागणार आहेत. उध्दव ठाकरे स्वतः आता पक्षाच्या कार्यात लक्ष घालणार आहेत. विदर्भ हा महाराष्ट्राचा महत्वाचा हिस्सा आहे. इथं आमचे आमदार, खासदार आहेत. 2024 ची तयारी आतापासून सुरू करायची आहे. त्यामुळं नागपूरवर लक्ष केंद्रित करावं लागेल. नागपूर हा हिंदुत्वाचा गड राहिलेला आहे. शिवसेनेला इथंही आपला झेंडा गाडायचा आहे. नागपुरात महापालिकेची निवडणूक (Municipal Corporation elections in Nagpur) आहे. या सर्व गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल, असंही संजय राऊत म्हणाले.
पोलिसांच्या बदल्या हा गृह खात्याचा अंतर्गत विषय आहे. त्यावर काही बोलणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. दिशाभुल केल्यामुळे एसटीचा संप लाबंला असल्याचंही त्यांनी सांगितलं. लालपरी धावू लागली आहे. त्याचा आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्रात राजकीय सभा खूप होतात. सर्वचं सभेवर लक्ष द्यायचं नसते. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या सभेवर दिली. भाजपने जवळ जवळ सर्व देश विकला आहे. केंद्र सरकारने अनेक उपक्रम विकले. मर्जीतल्या उद्योगपत्यांना भाजपने देश विकला, असल्याची टीका संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली.
राऊत म्हणाले, काल आयोध्या दौऱ्याबद्दल माझी मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंशी चर्चा झाली. आयएनएस विक्रांत हा मोठा घोटाळा आहे. कोणी बाहेर येऊन बडबड केली. लोकांना चुकीची माहिती दिली. तरी कारवाई मात्र होणारचं आहे. आम्ही पुराव्यासह बोललो आहोत. राजभवनातून आलेले पत्र हा सर्वात मोठा पुरावा आहे. आमच्यावर आरोप करून तुमचे आरोप धुतल्या जाणार नाहीत. आम्ही पुराव्यासहीत आरोप केले आहेत. हवेत गोळीबार केले नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांची किरीट सोमय्यांवर दिली.