नागपूर : पीडित तरुणी ही अंबाझरी पोलीस ठाण्याच्या (Ambazari Police Station) हद्दीत राहते. काही दिवसांपूर्वी तिची एक मित्राशी फेसबूकवरून ओळख झाली. दोन फेब्रुवारी रोजी कॅम्पस चौकातून त्या मित्राने आपल्या दुचाकीवर युवतीला बसवले. तिला जाफरनगर ले-आऊट (Jafarnagar layout) भागातील एका फ्लटमध्ये घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. बलात्कार करण्यापूर्वी तिला गुंगीचे औषध (Numb medicine) दिले होते. काही वेळाने दुसरा त्याचा एक मित्र आला. त्यानंतर चार-पाच जण तिथं आले. त्यांनी तिच्यावर बळजबरी केली. त्यामुळं युवती प्रचंड घाबरली होती. त्यानंतर तरुणीला सीताबर्डी भागात सोडून दिले. दुसर्या दिवशीसुद्धा तिला जाफरनगर भागात घेऊन जाऊन सामूहिक अत्याचार करण्यात आला. अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी दारूची पार्टी केल्याची माहिती आहे. तिच्यावर दुसर्यांदा सामूहिक अत्याचार झाल्यानंतर ती घरी गेली.
घरी गेल्यानंतर तिच्या पोटात दुखायला लागले. कुटुंबीयांनी तिला खासगी रुग्णालयात नेले. तपासानंतर तिच्यावर बळजबरी करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. पीडितेने गुरुवारी सायंकाळी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सामूहिक अत्याचाराची माहिती मिळताच डीसीपी विनिता साहू याही ठाण्यात पोहचल्या. पीडितेकडून घटनेची माहिती घेतली. तिने दिलेल्या माहितीनुसार, दोन मुले जाफरनगर तर दोन मुले बजेरिया येथील रहिवासी आहेत. गुन्हे शाखा आणि पोलिसांचा डीबी स्वॅड आरोपींच्या शोधासाठी कामाला लागले आहे.
यापूर्वी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अठ्ठावन्न वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना काल उघडकीस आली. पीडित महिला घरी एकटी असताना दोन जण पाणी मागण्याच्या बहाण्याचे तिच्या घरी शिरले. त्यानंतर पीडितेसोबत बळजबरी केली. त्या आरोपींचा शोध लागत नाही. तोच दुसरी घटना उघडकीस आली आहे. या पीडित युवतीले आधी अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. चार-पाचही आरोपी पसार झालेत. त्यामुळं पोलिसांसमोर आरोपींना अटक करण्याचे आव्हान आहे.