नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्ली दौरा केला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, दिल्लीत वीर बालदिवस होता. गुरुगोविंद सिंग यांच्या दोन मुलांचं सहा आणि नऊ वर्षांत बलिदान झालं. २६ डिसेंबरला केंद्र सरकारनं वीर बालदिवस आयोजित केला होता. गुरुगोविंद सिंग महाराष्ट्र आणि पंजाब यांचं नात आहे. त्यामुळं केंद्र सरकारच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं. बोलणाऱ्यानं माहिती घेतली पाहिजे होती की, कुठल्या कार्यक्रमाला चाललोय. त्या मुलांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं. परंतु, त्यांनी आपला स्वाभिमान जाऊ दिला नाही. अशा शौर्याच्या गाथा मुलांनी निर्माण केल्या. एक आदर्श पुढच्या पिढीला घालून देण्याचं काम केलं.
कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंत कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभाग हा केंद्रशासित प्रदेश झाला पाहिजे, असा ठराव मंजूर व्हायला हवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर बोलतना एकनाथ शिंदे म्हणाले, सीमावादाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. पहिल्यांदाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केला. दोन्ही मुख्यमंत्र्यांना बोलावून दोन्ही राज्यातील कायदा-सुव्यवस्था कशी राहील, यासाठी प्रयत्न केला. हा विषय ६० वर्षांपासून आहे.
असं असताना सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकरणावर कुठलाही परिणाम होणार नाही. याची काळजी आम्ही घेतो. जे बोलतात त्यांनी त्यांच्या योजना बंद केल्या. मुख्यमंत्री धर्मदाय निधी बंद केला. महात्मा ज्योतिबा फुले बंद केला. आणखी काय काय बंद केलं. आम्ही ते सुरू केलं.
दोन हजार कोटी रुपयांची म्हैसाळची योजना आम्ही सुरू केली. सीमा आंदोलनात जेल भोगलेला एकनाथ शिंदे आहे. त्यामुळं त्याच्या प्रती आम्हाला इतर लोकांनी शिकविण्याची आवश्यकता नाही. सीमावासीयांच्या पाठीशी सरकार खंबीर आहे. तसा ठरावही आम्ही सभागृहात आणणार आहोत, असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.