वाशिम: शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिम, यवतमाळ इथल्या संस्थांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यावरून गवळी यांनी गंभीर आरोप केले आहेत. भाजप शिवसेनेला टार्गेट करत आहे. ईडीची नोटीस न येताच ईडीच्या चौकश्या सुरू झाल्या आहेत, असा गंभीर आरोप भावना गवळी यांनी केला आहे. आपल्याला ईडीची नोटीस आलीच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (shiv sena MP Bhavana Gawali clarification on ED raid)
खासदार भावना गवळी यांनी टीव्ही9 ला पहिली प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकाची प्रतिनिधी म्हणून माझ्यावर ईडी होत असेल तर अनेकांच्या संस्था आणि कारखाने आहेत. त्यांची चौकशी का होत नाही? केवळ शिवसेनेच्या लोकांनाच का टार्गेट केलं जात आहे? अनिल परब यांना टार्गेट करायचं, सरनाईकांना टार्गेट करायचं सध्या राज्यात सुरू आहे, असा आरोप गवळी यांनी केला.
मला कोणतीही नोटीस आलेली नाही. मला नोटीस मिळालेले नाही. त्यामुळेच हा सर्व प्रकार जुल्मी आहे. एक महिला सातत्याने निवडून येत असल्याने तिला डॅमेज करण्याचा हा प्रकार आहे, असा हल्ला त्यांनी चढवला. भावना गवळी सातत्याने पाच वेळा निवडून येते आणि ग्रामीण भागातील लोकांना शिक्षण देण्याचं काम करते. मी कुणाची जमीन घेतली नाही. सरकारचा पैसा वापरला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
किरीट सोमय्या वगैरे लोकांनी माझ्यावर आरोप केले होते. तेव्हा संस्थेतला हिशोब मला मिळाला नसल्याचा एफआयआर दिल्याचं मी सांगितलं होतं. त्यामुळे त्या एफआयआरमधील केवळ 7 कोटी ट्विट करायचे किंवा 18 कोटी कुठून आले या सर्व गोष्टी करायच्या. माझ्यावर आरोप करायचे आणि माझ्यावर ईडी लावायचे हे सत्र सुरू आहे. जुल्मी सत्रं सुरू आहे. आणीबाणी सारखं हे सत्रं आहे. काय चौकशी करायची ती जरुर करा, पण भावना गवळीची चौकशी करत असताना भाजपचे आमदार आहेत, त्यांच्यावर 500 कोटी रुपयांचा आरोप आहे. त्यांचे कागदपत्रं ईडी ऑफिसमध्ये आले आहेत. माझी चौकशी करत असाल तर त्यांचीही चौकशी करा. ही माझी केंद्र सरकारला विनंती आहे, असं त्या म्हणाल्या.
वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी 2019 मध्ये चोरीला गेलेल्या सात कोटी रुपयाची चोरीची फिर्याद 2020 मध्ये दिली. मात्र सात कोटी रुपये आले कोठून असा प्रश्न भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. सोबतच खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखाण्या संदर्भात केलेल्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही यावेळी सोमय्या यांनी केला आहे. गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर ईडीचे अधिकारी पोहचले असून चौकशी सुरू आहे. (shiv sena MP Bhavana Gawali clarification on ED raid)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 30 August 2021 https://t.co/ZKb2sr6sXN #News #bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 30, 2021
संबंधित बातम्या:
ED Raid : आधी अनिल परबांना नोटीस, आता ईडीकडून भावना गवळींच्या 5 ठिकाणांवर धाडी
BREAKING – किरीट सोमय्यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांची दगडफेक
भावना गवळी कारखाना घोटाळा प्रकरणी पोलिसांना झटका, न्यायालयाकडून कारवाईचं शपथपत्र देण्याचे आदेश
(shiv sena MP Bhavana Gawali clarification on ED raid)