स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम! नागपूर शहरात आजपासून सुरुवात, काय आहे ही सिस्टीम?

| Updated on: Mar 04, 2022 | 6:06 AM

कचऱ्याची विल्हेवाट ही मोठी समस्या असते. स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमने आता कचरा उचलला जाणार आहे. त्यासाठी घरासमोर क्यूआर कोड लावण्यात येईल. कर्मचारी स्कॅन करून त्यानंतर कचरा घेऊन जाईल. काय आहे ही पद्धती समजून घ्या.

स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम! नागपूर शहरात आजपासून सुरुवात, काय आहे ही सिस्टीम?
नागपूर महापालिका
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : नागपूर शहरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत ( Swachh Bharat Abhiyan) कचरा संकलनाची व्यवस्था अधिक व्यापक आणि पारदर्शक करण्यासाठी क्यूआर कोड पद्धतीवर आधारित स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टिमची (Smart Waste Management System) सुरुवात शुक्रवार 4 मार्च रोजी सकाळी 9 वाजता महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते इतवारी टांगा स्टॅन्ड माधवराव मुकाजी चौक येथून होणार आहे. याप्रसंगी गांधीबाग झोन सभापती श्रीमती श्रद्धा पाठक, ज्येष्ठ नगरसेवक ऍड. संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक आणि विद्या कन्हेरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. (Municipal Commissioner Radhakrishnan b), स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस. उपस्थित राहतील. कचऱ्याची विल्हेवाट ही मोठी समस्या असते. स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमने आता कचरा उचलला जाणार आहे. त्यासाठी घरासमोर क्यूआर कोड लावण्यात येईल. कर्मचारी स्कॅन करून त्यानंतर कचरा घेऊन जाईल. काय आहे ही पद्धती समजून घ्या.

कचरा गोळा केला जाणार

सदर प्रकल्पाची सुरुवात महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून होत आहे. नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड व नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आय.सी.टी.वर आधारित सिस्टीम लागू करण्यात येत आहे. सुरुवातीला गांधीबाग झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक 19 व 22 मधून प्रायोगिक तत्वावर स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून कचरा गोळा केला जाणार आहे.

घरांवर क्यूआर कोडचे स्टीकर

यासाठी प्रत्येक घराचे जिओ टॅगिंग करून घरांवर क्यूआर कोडचे स्टीकर लावण्यात येतील. केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त कंपनीसोबत कचरा संकलन, ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग करण्याची मुभा प्रदान केली आहे. कचरा संकलन करणारा कर्मचारी आपल्या मोबाईलद्वारे क्यूआर कोड स्कॅन करेल आणि वजन करून कचरा घेईल. पहिल्यांदाच नागपूर शहरात अशा पद्धतीची क्यूआर कोड सिस्टीम लावण्यात येत आहे. या व्यवस्थेमुळे नागरिकांच्या घरातून ठराविक वेळेत कचरा उचलला जाणार आहे.

मेघालयाचे मुख्यमंत्री ते लोकसभेचे अध्यक्ष; पी. ए. संगमा यांना आधी काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी का सोडावी लागली?

तुम्ही पत्नीला संपत्तीमध्ये नॉमिनी केलंय? नसेल तर आजच करा; भविष्यातील संकटे टाळा

समृद्धी महामार्गावर जालन्यात राजेशाही सजावट, पुलावर लक्षवेधी नक्षीकाम, ‘जालना सोने का पालना’ थीम काय ?