देवाभाऊच्या शपथविधीला खास पाहुणा; नागपूर येथील लाडक्या चहावाल्याला निमंत्रण

| Updated on: Dec 04, 2024 | 12:25 PM

Nagpur Gopal Bawankule : देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी उद्या मुंबईतील आझाद मैदानावर होत आहे. त्यांची भाजपाच्या गटनेतेपदी आज निवड झाली. हा शपथविधी अनेक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. या शपथविधीला राज्यातील लाडक्या बहि‍णींना आमंत्रित करण्यात आले आहे. तर नागपूरमधील या चहावाल्याला सुद्धा निमंत्रण धाडण्यात आले आहे.

देवाभाऊच्या शपथविधीला खास पाहुणा; नागपूर येथील लाडक्या चहावाल्याला निमंत्रण
गोपाल बावनकुळे
Follow us on

देवेंद्र फडणवीस हे उद्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे. त्यांची भाजपाच्या गटनेतेपदी आज निवड करण्यात आली. उद्या 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होईल. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील. त्यांच्या ग्रँड शपथविधीसाठी राज्यातील लाडक्या बहि‍णींना आमंत्रित करण्यात आले आहे. तर नागपूरमधील या चहावाल्याला सुद्धा खास निमंत्रण धाडण्यात आले आहे. कोण आहे देवाभाऊचा लाडका चहावाला?

गोपाल बावनकुळे यांना निमंत्रण

पश्चिम नागपूरमधील गोपाल बावनकुळे यांचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. गोपाल बावनकुळे यांच्याशी त्यांची मैत्री आहे. बावनकुळे यांचे रामनगर येथे चहाचा ठेला आहे. त्यांनी चार वर्षांपूर्वी हा ठेला टाकला. त्यावेळी एकदा स्वत: फडणवीस हे चहा घेण्यासाठी तिथे आले. मुख्यमंत्री झाल्यावर आपण पुन्हा चहा पिण्यासाठी येऊ असा शब्द त्यांनी बावनकुळे यांना दिला होता. आता देवेंद्र फडणवीस हे उद्या राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण गोपाल बावनकुळे यांना पाठवण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आपला चहा पिण्यासाठी नक्की येतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

अश्रु अनावर, कंठ आला दाटून

देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण गोपाल बावनकुळे यांना मिळाले. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सारख्या सामान्य चहावाल्याला इतका सन्मान दिल्याचे भाव त्यांच्या डोळ्यात दाटले होते. त्यांना यावेळी अश्रु अनावर झाले. त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या दुकानात देवी-देवतांसोबतच देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो लावला आहे. या शपथविधीला गेलो अथवा नाही गेलो तरी आपल्या चहा स्टॉलवर लोकांना मोफत चहा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. हा आनंद साजरा करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. फडणवीस हे आपल्या मित्राला विसरत नाहीत, हे या निमित्ताने समोर आले आहे.