Special Report : २४ तासांत ठाकरे पिता-पुत्र चौकशीच्या फेऱ्यात, काय आहेत प्रकरणं?

| Updated on: Dec 23, 2022 | 11:20 PM

एनआयएच्या माध्यमातून चौकशी करावी लागली. राज्याचे मुख्यमंत्री हा तपास दाबत होते. असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला.

Special Report : २४ तासांत ठाकरे पिता-पुत्र चौकशीच्या फेऱ्यात, काय आहेत प्रकरणं?
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे
Follow us on

नागपूर : गेल्या २४ तासांत ठाकरे पिता-पुत्र चौकशीच्या फेऱ्यात आलेत. आधी दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आले. आणि आता उद्धव ठाकरे यांचीसुद्धा चौकशी होणार आहे. उमेश कोल्हे हत्या प्रकरण उद्धव ठाकरे यांनी दाबण्याचा प्रयत्न केला. असा आरोप रवी राणा यांनी केलाय. त्यानंतर गुप्तचर यंत्रणेद्वारे चौकशीचे आदेश देण्यात आलेत. २४ तासात ठाकरे पिता-पुत्र अडचणीत सापडलेत. आधी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात एसआयटी चौकशीचे आदेश देण्यात आलेत. नंतर उमेश कोल्हे हत्या प्रकरणात गुप्तचर विभागाकडून उद्धव ठाकरे यांची चौकशी होणाराय.

दिशा सालियन प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीचे आदेश दिले. त्यानंतर रवी राणा यांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरणात उद्धव ठाकरे यांची एसआयची चौकशीची मागणी केली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी १५ दिवसांत गुप्तचर यंत्रणेद्वारे चौकशी होणार असल्याचे आदेश दिले.


नुपूर शर्माची पोस्ट व्हायरल केल्यासंदर्भात हिंदू विचाराचे उमेश कोल्हे यांची हत्या झाली. त्यामध्ये ११ ते १२ आरोपी अटक केले. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एक महिना तपास रॉबरीच्या दिशेने करण्यात आला. त्या प्रकरणाला का दाबण्यात आलं. त्यासंदर्भात एनआयएच्या माध्यमातून चौकशी करावी लागली. राज्याचे मुख्यमंत्री हा तपास दाबत होते. असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला.

यावर शंभूराज देसाई म्हणाले, कोणाचा फोन आला का, हे तपासलं जाईल. ज्या-ज्या गोष्टी आपण केल्या त्याचा मुद्देनिहाय अहवाल प्राप्त करू. अहवाल आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनात आणून दिला जाईल.