ई पाससाठी हनिमूनचं कारण, कोथिंबिरीची जुडी घेऊन गावभर हिंडला, कारणं ऐकून पोलिसांना हसू आवरेना

| Updated on: Jun 11, 2021 | 5:24 PM

कोरोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे नागपूरमध्ये एक भन्नाट किस्सा घडल्याचं पाहायला मिळालं. हे पाहून पोलीसही अवाक झाल्याचं दिसलं.

ई पाससाठी हनिमूनचं कारण, कोथिंबिरीची जुडी घेऊन गावभर हिंडला, कारणं ऐकून पोलिसांना हसू आवरेना
Follow us on

नागपूर : कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लावलं, पण काही लोकांना ते पचनी पडलं नाही. कोरोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे नागपूरमध्ये एक भन्नाट किस्सा घडल्याचं पाहायला मिळालं. हे पाहून पोलीसही अवाक झाल्याचं दिसलं. नागपूरकर लॉकडाऊनमध्ये शहराबाहेर फिरायला जाण्याचे आणि शहरात फिरण्याचे भन्नाट कारण सांगत आहेत. कुणी ई पाससाठी हनीमुनचं कारण सांगितलं, तर एक पठ्ठा पोलीसांना भाजीपाला खरेदीचं कारण सांगत घराबाहेर पडला आणि एक कोथिंबीरीची जुडी घेऊन दिवसभर शहरात फिरला. लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरण्याच्या लोकांचे बहाणे पाहून पोलीसांनाही हसू आवरलं नाही, तर काही बहाणे ऐकून पोलीस अवाक झाले. लॉकडाऊनमधील नागपूरकरांच्या याच नाना बहाण्यांचा हा खास रिपोर्ट (Special report on reasons for E Pass application in Nagpur amid corona).

कोथिंबीरीच्या एका जुडीचा किस्सा ऐकूण नाकाबंदीवर असलेल्या नागपूर पोलिसांना हसू आवरलं नाही. नागपूरातील हा पठ्ठ्या सकाळी निघताना गाडीवर एक कोथिंबीरीची जुडी पिशवीत घेऊन निघाला, तेव्हाही पोलिसांना त्याने भाजीपाला खरेदीचं कारण सांगितलं आणि सायंकाळी घरी जातानाही तिच कोथिंबीरीची जुडी त्याच्याजवळ होती. तेव्हा पोलिसांनी त्याला चांगलाच जाब विचारला.

लॉकडाऊनमध्ये कोथिंबीरचा किस्सा ऐकून पोलिसांना हसू आवरलं नाही

लॉकडाऊनमध्ये कोथिंबीरचा किस्सा ऐकून पोलिसांना हसू आवरलं नाही, तर ई पाससाठी सांगितलेली कारणं पाहून पोलीस अवाक झाले. नागपुरात एकीकडे कोरोनाचं संकट भयावह स्थितीत होतं. रोज 6 ते 7 हजार रुग्ण, रोजचे वाढते मृत्यू, हॉस्पीटलमध्ये बेड मिळत नव्हते, अशा स्थितीत बहुतांश नागपूरकरांनी ई पास काढताना हनिमूनला जाण्याचे कारणं सांगितले. हे पाहून नागपूर पोलीस अवाक झाले. काहींनी नागपुरात बोअर झाले म्हणून ई पास मागितला तर काहींना वाघ बघायला ताडोबाला जायचं होतं.

3 ते 4 हजार जणांचे ई पास अर्ज नागपूर पोलिसांनी नाकारले

कोरोनाच्या इतक्या मोठ्या संकटात ई पाससाठी आलेली कारणं पाहून हसावं की रडावं हेच कळत नाही. एका झोनमध्ये अशी भन्नाट कारणं सागणाऱ्य़ा 3 ते 4 हजार जणांचे ई पास अर्ज नागपूर पोलिसांनी नाकारलेत, अशी माहिती नागपूर झोन दोनचे डीसीपी विनीचा शाहू यांनी दिलीय.

कोथिंबिरीची जुडी घेऊन गावभर हिंडला

लॉकडाऊनमध्ये ज्यांना खरंच गरज होती, त्यांना नागपूर पोलिसांनी ई पास दिले आणि शहरात बाहेर पडणाऱ्यांनाही मुभा दिली. पण एक कोथिंबीरीची जुडी घेऊन भाजीपाला खरेदीचं नावं सांगायचं आणि दिवसभर शहरात फिरायचं. रस्ते रिकामे आहेत म्हणून ड्रायव्हिंग शिकण्यासाठी बाहेर पड़ल्याचं कारण सांगायचं, तर एका कारमध्ये 5 जण चिकन खरेदीला जात असल्याचं कारण सांगायचं.

नागपूरकर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार?

लॉकडाऊनमधले हे किस्से भन्नाट असले, तरिही नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे 8 हजारपेक्षा जास्त नागपुरकरांचे बळी गेलेत. लोकांना याचं गांभीर्य कळलं नसेल, तर मग आपण मिळून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना कसा करु? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा :

नागपूरच्या चिमुकलीला दुर्धर आजार, एका इंजेक्शनची किंमत तब्बल 16 कोटी रुपये

उपराजधानी नागपुरातील आरोग्य सुविधांमध्ये एका वर्षात तब्बल 8 पटींनी वाढ, प्रशासनाचा दावा

चांगली बातमी ! नागपुरात 18 टक्के मुलांमध्ये अँटिबॉडीज, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी दोन हात करणे सोपे होणार ?

व्हिडीओ पाहा :

Special report on reasons for E Pass application in Nagpur amid corona