नागपूर : राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शंभूराज देसाई म्हणाले, चार महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेल्या सुषमा अंधारे शिंदे गटाच्या आमदारांवर आरोप केला जातो. त्या बाबतीत कुठलाही ठोस पुरावा नसताना आरोप करणं हे चुकीचं आहे. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या शहाजी बापूने कष्टातून जमीन विकत घेतली. घर बांधलं असेल तर ते त्यांच्या डोळ्यात खूपत आहे. सुषमा अंधारे यांना कावीळ झाल्याची टीका शंभूराज देसाई यांनी केली. कावीळ झाल्यावर जसं सगळं पिवळ दिसतं तशी अवस्था त्यांची झाली आहे, अशी टीका शंभूराज देसाई यांनी केली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सुषमा अंधारे सेनेत येण्यापूर्वी काय बोलल्या होत्या याची आठवण करून द्यावी, असंही ते म्हणाले.
एनआयटी भूखंडाबाबत शंभूराज देसाई म्हणाले, नागपूरमध्ये एनआयटीतील उच्च न्यायालयाचा आलेला निकाल गृहमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सादर केला आहे. सुषमा अंधारे या सभागृहात नाही. त्यांना कधी सभागृहात येण्याची संधी मिळणार नाही असाही टोला हाणला.
किती कडक शब्दात बोलले हे वरच्या नेत्यांना दाखवण्यासाठी अंधारे बोलत असल्याचीही टीका शंभूराज देसाई यांनी केली. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विसरून त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला आहे. पूर्वी सुषमा अंधारे बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल बोलले ते चालतं का असा प्रतिप्रश्न केला.
सुरज परमार प्रकरणात संजय राऊत यांनी हवेत तीर मारू नये. संजय राऊत यांच्याकडे आम्ही गांभिर्याने पाहत नाही. पत्राचाळ प्रकरणात तुम्ही फक्त जामिनावर सुटले आहेत. अनेक बाबी या प्रकरणात समोर येत आहेत. त्यामुळे कुठल्याही विषयासंदर्भात काही माहिती असेल तर आमच्या यंत्रणेकडे द्यावी. आम्ही त्याची चौकशी करू, असंही शंभूराज देसाई यांनी सांगितलं.
दिशा सालियन प्रकरण सीबीआयने कधी हाताळलच नाही. त्या दिशा सालियन प्रकरणांना पहिले एसआयटीच्या चौकशीला जा. नंतर इंटरपोलच्या चौकशीला समोर जा. असं उत्तर संजय राऊत यांना शंभूराज देसाई यांनी दिलं.