नागपूर : नागपूरच्या पंचशील चौकाजवळ (Panchsheel Chowk) विचित्र अपघात झाला. एका भरधाव आलेल्या बोलेरो गाडीने (Bolero Car) उभ्या कारला धडक दिली. त्यानंतर ती फुटपाथवर (Footpath) चढली. पुनः पलटत रोडवर येऊन एक उभी असलेली दुसरी कार बाईक आणि सायकलला चिरडले. एक महिला आणि पुरुष थोडक्यात बचावले. दुकानासमोर असलेल्या वस्तूंचंसुद्धा नुकसान झालं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. बोलेरो गाडीचे ब्रेक फेल झाले की, चालकाची चुकी याचा शोध सुरू आहे. कार, बाईक आणि सायकलचं मोठं नुकसान झालंय. मात्र, कुठलीही जीवितहानी झाली नाही. हा अपघात का झाला याचा शोध नागपूरचे पोलीस करत आहेत. बोलेरो अनियंत्रीत का झाली, हे कळायला मार्ग नाही. चालकच याचं उत्तर देऊ शकले.
नागपूरच्या पंचशील चौकाजवळ विचित्र अपघात pic.twitter.com/oOhqfNELpH
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) July 22, 2022
पंचशील चौक हा शहरातील मध्यवर्ती भाग. या ठिकाणी नेहमी प्रवाशांची वर्दळ असते. एवढ्यात एक बोलेरो आली. बोलेरो अनियंत्रीत होती. तीनं सरळ एका कारला चेपकवले. त्यानंतर फुटपाथवर ठेवलेल्या दुचाकी व सायकलवरून गेली. यामुळं दुचाक्या पडल्या. सायकल चेपकली. यात कार, दुचाकी आणि सायकलचं नुकसान झालं. पण, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. बाचूलाच एक महिला व पुरुष होते. ते थोडक्यात बचावले.
हा अपघात कसा झाला याचा शोध आता पोलीस घेत आहेत. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. हा भयानक अपघात पाहून थरकाप उडतो. बरं झालं माणसांना काही झालं नाही. बोलेरो येवढी अनियंत्रीत कशी झाली असेल, असा प्रश्न निर्माण होतो. एवढ्या गर्दीच्या ठिकाणी या बोलेरोचे ब्रेक तर फेल झाले नाहीत ना, अशी शंका येते. पण, थोडक्यात निभावलं ते बरं झालं.