नागपूर : नाशिकमधील प्रकरणावरून सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केली. एबी फार्म माझ्या नावानं दिला नव्हता. मला डावलण्याचा प्रयत्न केला गेला होता, असा आरोप सत्यजित तांबे यांनी केला. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांचीही काहीसी नाराजी त्यांच्या वक्तव्यातून दिसली. विजय वडेट्टीवार यांनीही काहीसी नाराजी व्यक्त केली. पक्षातूनच नेते आता नाना पटोले (Nana Patole) यांना शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र आहे.
गेल्या पंधरा-वीस दिवसापूर्वी एक विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली होती. तेव्हा देखील मी म्हटलं होतं महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या नेत्यांचा आपसात वैमनस्य आहे. ते बंद व्हावं, अशी अपेक्षा आशिष देशमुख यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, मी त्यालाच अनुसरून मल्लिकार्जुन खर्गे यांनासुद्धा पत्र लिहिलं.
आता माजी आमदार आशिष देशमुख यांनीसुद्धा नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तांबे प्रकरणात नाना पटोले यांचा हाय व्होल्टेज ड्रामा झाला. ते सत्यजित तांबे यांनी सांगितलेल्या बाबीवरून स्पष्ट झालं. उमेदीच्या नेत्यांना त्रास द्यायचा आणि त्यांना बाहेर जाण्यास भाग पाडायचं, असं काम प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करत आहेत, असा आरोपही आशिष देशमुख यांनी केला.
बाळासाहेब थोरात यांसारखे ज्येष्ठ नेते यांच्यासारख्या नेत्यांना सुद्धा त्रास देण्याचे काम झालं. हे त्यांनी पत्रातून दिल्लीला हाय कमांडकडे कळवलं. काँग्रेसमध्ये दोन गटच नाही तर गटागटात विभागली गेली आहे, असं मी म्हणेन, असंही आशिष देशमुख म्हणाले.
प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वात काम करणे कठीण झालं आहे. विदर्भाच्या 11 जिल्ह्यांतून मला अनेकांचे फोन येत आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामाचा सत्र सुरू होणार आहे. या सगळ्या बाबी संदर्भात दहा तारखेला काँग्रेस भवनमध्ये मीटिंग होणार आहे. त्यात नक्कीच नवीन रणनीती ठरणार आहे.
कार्यकारिणी बोलावली आहे. मोठ्या नेत्यांनी जेव्हा नाराजी व्यक्त केली आहे. स्वाभाविकच या ठिकाणी नाना पटोले यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे दहा तारखेला हाच एकमेव विषय चर्चेला यावा अशी माझी मागणी असल्याचं आशिष देशमुख यांनी म्हंटलं.
दहा तारखेची मीटिंग ही हाय व्होल्टेज मीटिंग होईल. 440 व्होल्टेजची मिटिंग असेल. प्रदेशाध्यक्ष बदलावा ही मागणी सर्वांचीच आहे. ज्याप्रमाणे काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीने निवडला त्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष सुद्धा निवडणुकीच्या माध्यमातून निवडावा, अशी मागणी आहे. तो अध्यक्ष सगळ्यांना न्याय देणारा असावा, असं मत काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.