नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी 13 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली (Dhantoli), नेहरुनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, आशिनगर आणि मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक (Prohibited Plastic) पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. 55 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक बंदीचा पार्श्वभूमीवर मनपातर्फे आतापर्यंत 93 प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात आली. 4 लाख 80 हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहे. धंतोली झोन अंतर्गत मानेवाडा (Manewada) रोड येथील नवदुर्गा साडी सेंटर आणि जुना बाबुलखेडा येथील पदमावती किराणा स्टोअर्स यांच्याविरूध्द कारवाई करण्यात आली. प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत ज्ञानेश्वर नगर येथील गजानन डेली निडस यांच्याविरूध्द 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत नंगा पुतला चौक, गांधीबाग येथील बोडे खाद्य भंडार तसेच विकास क्लॉथ शॉप आणि शहीद चौक, इतवारी येथील हुडीया ट्रेडर्स यांच्याविरूध्द 15 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
सतरंजीपुरा झोन अंतर्गत मस्कासाथ येथील महेन्द्र किराणा ॲण्ड जनरल स्टोअर्स आणि राऊत चौक येथील शैलेन्द्र किराणा ॲण्ड कंपनी यांच्याविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. आशिनगर झोन अंतर्गत कमाल चौक येथील राजपुत रेस्टॉरेंट यांच्याविरूध्द 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोन अंतर्गत मंगलवारी बाजार, सदर येथील साई फ्रुट सेंटर आणि माँ वैष्णवी फ्रुट सेंटर यांच्याविरूध्द 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत नॉर्थ अंबाझरी रोड येथील Singh Builders यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच आशिनगर झोन अंतर्गत लष्करीबाग कमाल चौक येथील Aradhana The Fassion Mall यांच्याविरुध्द परवानगीशिवाय विद्युत खांबावर फलक/होर्डिंग्ज लावल्याबद्दल कारवाई करण्यात आळी. प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.