नागपूर : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील (National Highways) कोंढाळी हे गाव आहे. अमरावतीवरून नागपूरकडे जाणाऱ्या कारचा टायर फुटला. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू (All three died on the spot) झाला. टायर फुटल्याने कारचालकाचे नियंत्रण सुटले. कार डिव्हायडरवर आदळली. कारमधील एक महिला दोन पुरुष जागीच ठार झाले. कोंढाळीवरून राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळं या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ (Road traffic) असते. चालकाची कार वेगाने होती. अशात टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण राहिले नाही. ही कार सरळ बाजूला असलेल्या डिव्हायडरवर आदळली. कार इतक्या जोराने आदळली की, कार पूर्णपणे चक्काचूर झाली. कारच्या काचा फुटल्या. ही कार चेपकली. कारमध्ये बसलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मृतकांच्या शरीराच्याही चिंधड्या उडाल्या. घटनेनंतर गर्दी जमा झाली. कारमधील मृतकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहचले. मृत कोण आहेत, याचा तपास सुरू आहे. मृतकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार, मृतक अनुप गुप्ता, रेणुका गुप्ता व अशोक गुप्ता हे जबलपूर येथील रहिवासी आहेत. ग्वाल्हेर येथील अर्चना संदीप जायस्वाल या कार चालवित होत्या. खुर्सापार-कोंढाळीजवळील सूत गिरणीजवळ हा अपघात झाला. कारने तीन-चार पलट्या मारल्या. तिन्ही मृतकांच्या शरीराचे तुकडे झाले. ऑटोचालक रमजान पठाणनं घटनेची माहिती पोलिसांना दिली.
कोंढाळीचे ठाणेदार चंद्रकांत काळे तसेच महामार्ग सुरक्षा सहाय्यता पोलीस गणेश भोयर कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. तिन्ही मृतकांना काटोल येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. काटोलचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पांडे, शरद मेश्राम, सुनील बंसोड, मंगेश धारपुरे, रवी बांबल, सुखदेव धुळ हेही घटनास्थळी पोहचले. कारला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. जखमी असलेल्या चालक अर्चना जायस्वाल यांना नागपूरला उपचारासाठी पाठविण्यात आले.