नागपूर : उत्तर प्रदेशसह पाच राज्यात भाजप पराभवाच्या छायेत आहेत. त्यामुळं आपलं पाप केंद्र सरकार दुसऱ्यावर ढकलत आहेत. अचानक लॅाकडाऊन लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मजुरांना वाऱ्यावर सोडलं होतं. त्याच मजुरांना महाराष्ट्र काँग्रेसने घरी सोडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) यांनी अशी टीका केलीय. ट्रम्प यांचा कार्यक्रम करुन यांनी देशात कोरोना पसरवला. आणि हे थाळ्या वाजवत राहिले. आम्ही सेवा केली, असंही वडेट्टीवार म्हणाले. आज प्रेस घेऊन याचा खुलासा आकडेवारीसह करणार असं त्यांनी सांगितलं. कोरोनात मजुरांसाठी (For laborers in Corona) आम्ही काय केलं ते सांगणार असल्याचं ते म्हणाले. मजूर जात असताना भाजपने टीका केली होती, अशी आठवण त्यांनी करून दिली.
विजय वडेट्टीवार म्हणाले, ॲानलाईन अर्ज केलेल्या कोरोना मृतकांच्या ऐंशी टक्के वारसांना मदत केली. महाराष्ट्रात एक लाख 40 हजार कोरोना मृत्यू दाखवले. 1 लाख 43 अर्ज आले. यापैकी 80 टक्के वारसांना मदत केली. एक लाख 77 हजार जणांना निधी दिला. आणखी मदत करणार आहोत. भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमध्ये कोरोना मृतकांचे आकडे लपवले. गुजरातमध्ये 13 हजार मृत्यू दाखविले आणि 1 लाख 24 हजार अर्ज कसे आले. भाजपानी आकडे लपवले, महाराष्ट्राने काहीही लपवलं नाही, असंही स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी दिलंय.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेसने मुंबईत स्थलांतरित मजुरांना पास दिली. हे मजूर उत्तर प्रदेश, बिहारमध्ये परतले. त्यामुळं राज्यांमध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला, अशा टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लोकसभेत मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. महाराष्ट्र काँग्रेसमुळंच देशात कोरोना पसरल्याचं मोदी म्हणाले. त्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते एकवटले. त्यांनी भाजपवर शरसंधान साधणे सुरू केलंय. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात ओबीसी याचिका आज बोर्डावर आली नाही. दुपारी कळेल कधी सुनावणी होईल. पण आज आम्ही अहवाल सादर करणार, असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.