नागपूर : नागपूर ते मुंबई असा हा समृद्धी महामार्ग आहे. 10 जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे. 27 तालुके आणि 292 गावं या महामार्गाला जोडली जाणार आहेत. एकूण 710 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. त्यापैकी 210 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. नागपूर ते सेलूबाजारपर्यंतचा हा पहिला टप्पा दोन मे रोजी सुरू होतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या महामार्गाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. भारतातील सर्वात मोठा असा हा महामार्ग आहे. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा हा महामार्ग आहे. मुंबई ते नागपूर (Mumbai to Nagpur) हे अंतर आधी 14 तास लागायचे हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर सात ते आठ तासात प्रवास करता येणार आहे. या महामार्गावर एकूण 65 उड्डाणपूल राहणार आहेत. 6 बोगदे राहतील. तसेच 26 ठिकाणी टोल वसूल केला जाईल. 120 किमी प्रतीताश वाहतुकीचा वेग ठेवता येणार आहे. 11 लाख झाडं या महामार्गावर लावण्यात येणार आहेत. डिसेंबर 2023 पर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल, असं आश्वासन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिलंय. दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते सुरू होईल.
नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, नगर, नाशिक, ठाणे या दहा जिल्ह्यांतून जातो. तसेच चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड या 14 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. असे या महामार्गाशी महाराष्ट्रातील एकूण 24 जिल्हे जोडले जाणार आहेत. 26 टोल स्टेशनवर 2 हजार 624 कर्मचारी राहतील. कार, जीप, व्हॅन किंवा हलक्या वाहनांसाठी प्रतिकिलोमीटर 1.73 रुपये टोल आकारला जाणार आहे. नागपूर ते मुंबई असा कारने प्रवास केला तर या महामार्गावर एक हजार 213 रुपये टोल द्यावा लागेल.
वाहनांचा प्रकार प्रतिकिलोमीटरसाठी टोल (31 मार्च 2025 पर्यंत)
कार, जीप, व्हॅन किंवा हलकी वाहने… 1.73 रुपये
माल वाहतुकीची वाहने किंवा मिनी बस… 2.79
ट्रक, बस (दोन आसांची)… 5.85
3 आसांची व्यावसायिक वाहने… 6.38
अवजड बांधकाम यंत्रसामग्री (एचसीएम)
अनेक आसांची वाहने (चार किंवा सहा आसांची)… 9.18
अति अवजड वाहने (7 किंवा जास्त आसांची)… 11.17