नागपूर : चुकून एक शून्य वाढला आणि सरकारने (Government) अतिरिक्त 32 कोटी जमा केले. नागपूरच्या मेयो रुग्णालयातील (Mayo Hospital) हा अजब प्रकार घडला. 2921-22 या आर्थिक वर्षासाठी मेयो रुग्णालयाला सरकारकडून ३.५ मिळायला हवे होते. पण १ शून्य वाढल्यामुळे त्यांना 35.63 कोटी मिळाले. सरकारने जीआर काढून 10 कोटी परत घेतले. पण उर्वरित पैशांचं काय झालं याचा अजून पत्ता लागलेला नाही. शासनाला मेयो रुग्णालयाला 3.5 कोटी रुपये द्यायचे होते. पण, चुकून एक शून्य जास्त प्रेस झाला. 35 कोटी 63 लाख रुपये मेयोच्या खात्यात जमा झाले. मेयो रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना ही चूक लक्षात आली. ही तर छोटीशी कारकुनी चूक होती. असं म्हणतं अतिरिक्त रक्क्म परत घेण्याची विनंती शासनाला करण्यात आली. त्यासाठी शासनाने परिपत्रक (Government circular) काढले. दहा कोटी 43 लाख रुपये परत घेण्यात आले.
डीबीएसनं नियुक्त केलेले प्राध्यापक आणि सुरक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे होते. महाविद्यालयाला केवळ 3.5 कोटी द्यायचे होते. विनंतीपत्रात रकमेचे आकडे हजारात नमुद करायचे होते. लेखाविभागाकडून आकड्यासमोर एक शून्य अधिक जोडला गेला. असा हा घोळ झाल्याचे मेयो प्रशासनाने स्पष्टीकरण दिलंय. विशेष म्हणजे शासनाकडून ते मंजूर करून जमाही झालेत. मेयोने दहा कोटी 43 लाख रुपये उपयोगात आणले गेले. ही रक्कम इतर महाविद्यालयांकडं वळती करण्यात आली. यामुळं घोळ निर्माण झालाय. शासनाने एका आर्थिक वर्षासाठी एवढा मोठा निधी कसा मंजूर केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शासनानं एवढी मोठी रक्कम वळती केली. त्यानंतर हे कुणाच्याही लक्षात आले नाही. मेयो प्रशासनानं आलेली बरीच रक्कम खर्च केली. त्यांच्या कर्मचाऱ्यांच्याही हे लक्षात आले नाही. आलेली रक्कम इतरत्र वाटप करण्यात आली. काही रक्कम शासनाला परत केली असली तरी काही रक्कम परत करायची आहे. सरकारी कर्मचारी झोपेत काम करतात काय, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.