नागपूर : मकरसंक्रात संपली. पण, अजूनही काही जण पतंग उडवितात. शिवाय पतंग उडविताना (While flying a kite) होणारे नुकसान अजूनही सुरूच आहे. कित्तेक जण नायलॉन मांजाने जखमी (Injured by nylon) झाले. त्या जखमी अजून भरून निघालेल्या नाहीत. अशातच एक घटना घडली होती. अकरा वर्षीय मुलगा टेरेसवरून पतंग उडवित होता. पतंग उडविता-उडविता त्याचा तोल गेला. दोन माळ्यांवर असलेल्या टेरेसवरून (From the terrace with two gardens) खाली पडला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना सत्तावीस जानेवारी रोजी घडली होती. भांडेवाडी येथील मयूर शाहू असं मृतकाचं नाव आहे. शहरातील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली होती.
मुलांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात असं आईवडिलांना वाटते. त्यामुळं त्यांना जे हवं ते ते देण्याचा प्रयत्न करतात. मला हेच हवं, असा हट्ट मुलं धरतात. पण, त्यांच्या किती गरजा पूर्ण करायचं हे पालकांवर अवलंबून आहे. त्यांनी त्यांच्या गरजा प्राथमिकतेनुसार पूर्ण करायला हव्यात. पण, काही पालक मुलांना जे हवं ते देतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवत नाही. त्यामुळं अशाप्रकारचे अपघात होतात. त्यामुळं मुलांकडं लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
वर्धा रोडवरील साई डेअरीसमोरून दोन मित्र रस्ता ओलांडत होते. योगेश येडे व कमलेश सोनवणे हे युवक रस्ता क्रास करत होते. दरम्यान, खापरीकडून येणाऱ्या थ्री व्हीलर ऑटोने कमलेश यांना धडक मारली. या ते जखमी झाले. कमलेश यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वाठोडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. रस्ता ओलांडताना सांभाळून चालणे अत्यंत आवश्यक आहे.