अमरावती : मुलीने आंतर जातीय प्रेमविवाह केल्याने आईवडील चिडले. त्यांनी मुलीला चक्क जनावरांप्रमाणे मारहाण करत फरपटत नेले. ही घटना अमरावती जिल्ह्यातील अंबाडा (Ambada) या गावात घडली. सावरखेड येथील एका 19 वर्षीय तरुणीचे अंबाडा येथील प्रतीक तडस (Prateek Tadas) या युवकाशी प्रेम संबंध होते. या दोघांनी 28 एप्रिल रोजी अमरावती येथे आर्य समाज मंदिर येथे विवाह केला. त्यानंतर मुलगी चार मे रोजी घरून मुलाकडे निघून गेली. आई-वडिलांनी शोधाशोध केल्यानंतर ती अंबाडा येथे असल्याचे त्यांना समजले. मुलीकडील दहा ते बारा जण अंबाडा येथे पोहोचले. त्यांनी मुलीला फरपटत, मारहाण करत उचलून नेले. प्रतीकने आपल्या पत्नीला मारहाण करून नेल्याची मोर्शी पोलीस (Morshi Police) ठाण्यात तक्रार केली. मात्र गेले तीन दिवसांत पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. काल रात्री उशिरा सदर युवतीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यातून पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी या मुलीचे इन कॅमेरा बयान होणार असल्याचं मोर्शीचे पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांनी सांगितलं. प्रेम विवाह करणारे तरूण-तरुणी आता पुन्हा एकत्र येणार आहेत. अंबाडा या गावातील एका 22 वर्षाच्या तरुणाचे परिसरातील एका 19 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमातूनच दोघांनी एकत्र येऊन आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचा निर्णय घेतला. या प्रेमविवाहाला मुलीच्या घरच्यांचा विरोध आहे. अशातच 28 एप्रिलला या तरुणाने आणि तरुणीने अमरावतीमधील आर्य समाजात प्रेम विवाह केला. त्यानंतर दोघेही आपल्या अंबाडा येथे घरी सुखाने नांदत होते.
आपल्या मुलीने आंतरजातीय प्रेम विवाह केला, ही गोष्ट तिच्या घरच्यांना मान्य नव्हती. म्हणूनच चार तारखेला मुलीचे आई-वडील व त्यांचे नातेवाईक हे मुलाच्या घरी आले. काही वेळ चर्चा केल्यानंतर अचानक मुलीच्या आई-वडिलांनी मुलीला मारहाण केली. जबरदस्तीने तिला फरफटत नेत घरी नेल्याचा आरोप मुलाने केला होता. शेवटी पोलिसांनी मुलीचे बयाण घेतले. ती मुलगी सज्ञान आहे. तिला तिच्या प्रियकरासोबत राहायचे आहे. त्यामुळं पोलिसांनी तिला तिच्या प्रियकरासोबत सोपविले. आर्य समाजाच्या पद्धतीने त्यांचे लग्नसुद्धा झाले आहे.