यवतमाळ : जिल्ह्यातील वणी शहरात वायू प्रदूषणाची मोठी समस्या आहे. वाढत्या प्रदूषणामुळं लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. टीव्ही 9 मराठीने दाखवलेल्या या बातमीची दखल घेत, प्रदूषणाबाबत उपाययोजना कराव्यात यासाठी भाजपचे स्थानिक नेते विजय पिदूरकर यांनी वणी एसडीओ यांना निवेदन दिलंय.
कोल वॅाशरीज, गिट्टी क्रशर, सिमेंट प्लांट, कोल वाहतूक यामुळं प्रदूषण वाढलंय. त्यामुळं वणी तालुक्यात एअर क्वॅालेटी मॅानिटरिंग स्टेशन बसवावं, अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आलीय. याबबातचं निवेदन त्यांनी एसडीओमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय.
वणी तालुका कोळसा, सिमेंट, चुनखडी, उतरणी माल भरणे आणि सोडणे यामुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. गिट्टी वाहतूक करताना गिट्टीची चुरी रस्त्यावर आणि बाजूच्या शेतात उडते. त्यामुळं पीकं धोक्यात आली आहेत. हीच चुरी लोकांच्या अंगावर उडाल्यामुळं ध्वनी प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे.
सॅटेलाईटवरून मिळालेल्या माहितीनुसार, 50 पर्यंत गुणवत्ता असेल, तर ते वायू चांगले आहे. 50 आणि 100 च्या मधात असेल तर ते समाधानकारण आहे. परंतु, 100 च्या वर असेल तर ते आरोग्यास घातक आहे. खनिज विकास निधीत यवतमाळ जिल्ह्याचा 90 टक्के वाटा आहे. येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. अस्थमा, श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात झाले आहेत. त्वचारोग, चिडचिडेपणा यासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. चुरी डोळ्यात गेल्यानं डोळ्यांचे आजार झाले आहेत. गाड्यांच्या कर्णकर्कश आवाजानं बहिरेपणासारखी समस्या उभी ठाकली आहे. तरीही खाण बाधित क्षेत्रात 25 टक्केसुद्धा निधी खर्च केला जात नाही.
माणूसच नव्हे तर जनावरेही या आजाराला बळी पडत आहेत. ते धूळमिश्रित गवत खात आहेत. शेततळ्यातल्या आणि नाल्यातल्या पाण्यावर धूळ साचली आहे. ते धूळमिश्रित पाणी पिणेही जनावरांसाठी धोकादायक आहे. धुळयुक्त विषारी पाणी पिऊन जनावरे धोकादायक स्थितीत आली आहेत.
ही परिस्थिती लक्षात घेता वणी, मारेगाव आणि झरी तालुक्यातून प्रमुख खनिज म्हणून वायूची गुणवत्ता दाखविणारं स्टेशन आवश्यक आहे. ते अद्याप वणी तालुक्यात बसविलेलं नाही. ते बसविल्यास नेमके किती आणि कसे प्रदूषण होते, हे स्पष्ट होईल. एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन बसवावं, अशी मागणी एसडीओंमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
इतर बातम्या