नागपूर – एकाच घरात दोन-तीन पक्षांचे लोकं आहेत. असं असेल तर सोडून द्या राजकारणातून बाहेर पडा, असा सल्ला अभिनेता नाना पाटेकर यांनी दिला. नागपुरात ते बोलत होते. एकमेकांना आपण सांभाळणार आहोत. हे कधी कळणार आपल्याला, असा सवालही त्यांनी केला. पुन्हा पुन्हा त्याच चक्रव्युव्हार का जातोय. एखादा अधिकारी भ्रष्ट अधिकारी असेल. सगळे मिळून का बोलत नाहीत. तो एक असतो. तुम्ही सगळे आहात. सगळे मिळून त्याच्याविरोधात बोला, असंही पाटेकर म्हणाले. एकत्र व्हा. आपल्यामध्येच राज्यकर्त्यांनी आपल्यामध्ये भींती बांधून टाकल्या आहेत. त्या तोडा. मग, हे सर्व सगळं संपेल. धर्म, जात कधी पाहिली नाही. अभिनेता म्हणून माझा चित्रपट पाहिला जातो. आवडला तर बघतात अन्यथा नाही, असंही त्यांनी सांगितलं.
नाना पाटेकर म्हणाले, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायकोला चेक देण्याची वेळ येते. यासारखी दुर्दैवी बाब नाही. हा स्वागत समारंभ असू शकत नाही. प्रत्येकानं यामध्ये आपला सहभाग दिला पाहिजे.
मला माझ्या वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांसाठी काय करता येईल. याचा प्रयत्न करतो. सरकार त्यांच्या पातळीवर काम करतं. प्रत्येकवेळी सरकारवर अवलंबून असणं योग्य नाही. आपण काय करू शकतो, हे महत्त्वाचं आहे. कोकण, पुण्यात पाऊस आल्यानंतर सगळ्या मोहोर गळून पडतो. कुठलं पीक घेतलं तर शेतकऱ्याला फायदा होईल, याचा विचार केला पाहिजे. असा प्रयोग केला होता, याची आठवण त्यांनी करून दिली.
शेतकऱ्याला तीन हजारांऐवजी एकरी तीन लाख रुपये मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला हमी देता आली पाहिजे. शासकीय दृष्टीकोनातून विचार करावा. पुढं येऊन काम करणारी माणसं हवीत.
शेतकऱ्यानी पारंपरिक पद्धतीनं शेती करून नये. पद्धत बदलली पाहिजे. लोकसंख्या वाढली. जमीन तेवढीच आहे. सगळं तेच आहे. माणसं वाढली. पण, आपण सर्व एक दिवस जाणार आहोत. इतिहासात नोंद व्हायला पाहिजे, असं नाही. समाधान नावाची गोष्ट हवी. प्रत्येक गोष्टीला पुरस्कार कशाला हवा, असा टोलाही नाना पाटेकर यांनी लगावला.