देशात डोळा मारणारे दोन जण झालेत; खासदार अनिल बोंडे यांनी दोघांचंही नाव सांगितलं

| Updated on: Mar 12, 2023 | 1:59 PM

उद्धव साहेब बोलतील, असं म्हणून अजित पवार बाजूला झाले. त्यानंतर त्यांनी एक कार्यकर्त्याकडं पाहून डोळा मारला होता. यावर बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले,..

देशात डोळा मारणारे दोन जण झालेत; खासदार अनिल बोंडे यांनी दोघांचंही नाव सांगितलं
खासदार अनिल बोंडे
Follow us on

नागपूर : विरोधी पक्षनेते अजित पवार हे अर्थसंकल्पावर बोलत असताना उद्धव ठाकरे आले. त्यावेळी उद्धव साहेब बोलतील, असं म्हणून अजित पवार बाजूला झाले. त्यानंतर त्यांनी एक कार्यकर्त्याकडं पाहून डोळा मारला होता. यावर बोलताना खासदार अनिल बोंडे म्हणाले, विरोधकांनासुद्धा या बजेटबद्दल चांगलं बोलावं लागलं. अजितदादा यांना डोळा मारावं लागला. देशात आता डोळा मारणारे दोन जण झालेत. एक अजितदादा आणि दुसरे राहुल गांधी. अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे बोलत असताना अजित पवार डोळा मारतात. एवढा अपमान झाला आणि शिवसैनिकाना काहीच वाटले नाही. मी पण शिवसैनिक होतो, असं भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी नागपुरात पत्रकार परिषदेत सांगितलं.

उत्पादन वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न

अनिल बोंडे म्हणाले, अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं मोठं नुकसान होते. तेव्हा महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना काहीच दिलं नव्हतं. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने मागच्या वेळी NDRF च्या नियमांपेक्षा जास्त मदत केली. आतासुद्धा पंचनामे करण्याचे आदेश दिले. नुकसानभरपाई देण्यात येईल. शेतकरी आत्महत्या होत आहेत, हे थांबविण्यासाठी त्यांचं उत्पादन वाढविण्यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केला. त्याला यश येत आहे.

हे सुद्धा वाचा

हे कुठल्याच राज्यात झालं नाही

अजित पवार शेतकऱ्यांना 6 हजार देणार असल्यावर अनिल बोंडे म्हणाले की, घरात 4 लोक असतील तर त्याची रोजी 3 रुपये होणार हा शेतकऱ्यांचा अपमान नाही का ? मात्र यांनी सरकार असताना शेतकऱ्यांना दमडी तरी दिली का ? असा प्रश्न आहे. कोरोना आणि महाविकास आघाडीचा काळ महाराष्ट्राला लुस्त करून टाकणारा होता. मात्र आता अर्थमंत्री यांनी मांडलेला अर्थसंकल्प सगळ्यांना सुख देणारा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे यासाठी मांडलेला अर्थसंकल्प आहे. 40 हजार लोकांच्या सूचना लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडला. शेतकऱ्यांसाठी नमो किसान निधी शेतकऱ्यांना मिळणार आहे. एक रुपयात नोंदणी करा. तुमचे विम्याचे हफ्ते सरकार भरणार हे कुठल्याच राज्यात झालं नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात मदत झाली नाही.

नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50 हजार रुपये देण्याचं महाविकास आघाडीने कबुल केलं होतं. मात्र दिले नाही. आता आमच्या सरकारने ते पुन्हा सुरू केलं. प्राकृतिक शेतीला सरकारने महत्व दिले. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांना विरोधात सुद्धा बोलता येत नाही. म्हणून ते आता म्हणतात शेतकऱ्याचं वीज बिल वाढणार. मात्र तसं नाही, आता सोलर ऊर्जा वाढविली जात आहे, असंही अनिल बोंडे यांनी म्हंटलं.