गजानन उमाटे, नागपूर : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांना जिवे मारण्याची धमकी आली आहे. त्यानंतर श्याम मानव यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. तुमचा दाभोळकर करू अशी धमकी श्याम मानव यांना देण्यात आली आहे. धीरेंद्र महाराज ऊर्फ बागेश्वर बाबा यांच्या भक्तांकडून ही धमकी आल्याची माहिती आहे. त्यामुळं श्याम मानव यांच्या रवी भवन येथील सरकारी निवासाला सुरक्षा वाढविण्यात आली आहे. अनोळखी व्यक्तीविषयी माहिती सांगण्याची दिव्यदृष्टी आपल्याकडं असल्याचा दावा धीरेंद्र महाराज यांनी केला.
ज्या काही धमक्या आलेल्या आहेत, अशा धमक्या मला गेल्या ४० वर्षांत येत आहेत. आता धीरेंद्र महाराज यांची जी केस आहे त्या निमित्ताने आमच्या यंत्रणेच्या मोबाईलवर धमकी आलीय. पोलिसांनी या धमकीची दखल घेतलीय. त्या पद्धतीनं पोलीस कारवाई करतील, असं मत श्याम मानव यांनी व्यक्त केलं.
मुलाच्या मोबाईलवर धमकी आलीय. मुळात अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा रद्द करण्याची मागणी करण्याची गरज आहे. त्यांनी फक्त धिरेंद्र महाराज यांना सांगावं ती त्यांची दिव्य शक्ती सिद्ध करावी, हा कायदा रद्द होतो.
धीरेंद्र महाराज यांना अटक करण्याची मागणी मी आठ तारखेला पोलिसांत तक्रार केली तेव्हाच केलीय. आठ आणि १० तारखेला मी तक्रार केली. कारण अंद्धश्राद्धा निर्मूलन समितीचा कायदा हा धीरेंद्र महाराज यांच्या व्हिडीओला लागू होतो. हा नॅान बेलेबल अफेन्स आहे. त्यामुळे अटक होते, असंही श्याम मानव म्हणाले.
दाभोळकर किंवा मी दोघेही हिटलिस्टवर होतो. दाभोळकर यांचा खून झाला. तेव्हापासूनच पोलिसांनी ही सुरक्षा दिलीय. अशा पद्धतीनं धमक्या येत आल्या. आमच्या फोटोवर क्रॅास होता. ही धमकी पोलीस गांभिर्याने घेतील. त्यामुळे मी निश्चिंत आहे, असंही श्याम मानव यांनी सांगितलं.
सनातनी लोकांचा अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचा कायद्याला प्रचंड विरोध होता. कायद्याचा विरोध करण्याची गरज नाही. धीरेंद्र महाराज यांनी दिव्यशक्ती सिद्ध केली तर हा कायदा रद्द होईल, असं आवाहन त्यांनी केलं.