नागपूर : गेल्या दोन दिवसांपासून देशासह राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप आमने सामने आली आहे. त्यातच राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाविरोधात वक्तव्य केल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला आहे. त्याविरोधात भाजपकडून राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. तर भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाई केल्यामुळे लोकशाहीची वाटचाल हुकुमशाहीकडे होत असल्याचा आरोप केला गेला करत राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई जोपर्यंत मागे घेतली जात नाही तोपर्यंत काँग्रेसकडून आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
भाजपकडून राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याची आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरात त्यांच्याविरोधात आंदोलन केले जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले होते.
तर काल सोलापूरात राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केले गेल्यानंतर आज सोलापूरातच राहुल गांधी यांच्या समर्थनात त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेकही करण्यात आला.
त्यामुळे काँग्रेससनेही भाजपला जशास तसे उत्तर दिल्याचे आज दिसून आले. तर सोलापूरात दुग्धाभिषेक करण्यात आल्यानंतर नागपूरात आज राहुल गांधी यांच्या समर्थनाथ मशाल मार्च काढून राहुल गांधी यांच्यावरील कारवाई मागे घ्या अशा घोषणा देत भाजप विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात आणि राहुल गांधींच्या समर्थनात नागपुरात युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मशाल मार्च काढून राहुल गांधी यांच्या सर्मथनात घोषणाही देण्यात आल्या.
यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राम कुलर चौकापासून निघालेला हा मार्च महाल परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पोहोचला.
या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि राहुल गांधींना न्याय मिळत नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.