Nagpur Crime | दोन बहिणींमध्ये हाणामारी, एकीचा गेला जीव; कारण काय?

| Updated on: Dec 26, 2021 | 9:43 AM

दोन्ही बहिणींनी घरावर आपला हक्क सांगितला. दोघींनीही वाद घातला. एकमेकींशी फ्रिस्टाईल केली. यात एकचा जीव गेला, तर दुसरीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला.

Nagpur Crime | दोन बहिणींमध्ये हाणामारी, एकीचा गेला जीव; कारण काय?
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नागपूर : भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी, अशी एक म्हण आपल्याकडं आहे. असाच प्रकार नागपुरात घडला. भावाने एका गृहस्थाची सेवा केली. त्या मोबदल्यात त्याला घर मिळणार होते. भावाच्या घरी राहण्यासाठी दोन बहिणी आल्या. दोन्ही बहिणींनी घरावर आपला हक्क सांगितला. दोघींनीही वाद घातला. एकमेकींशी फ्रिस्टाईल केली. यात एकचा जीव गेला, तर दुसरीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला.

मालमत्तेसाठी दोन सख्ख्या बहिणी एकमेकींच्या वैरी बनल्या. त्यांच्यात झालेल्या हाणामारीत धर्मशीला बालचंद्र डहाट नामक महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी जयशिला गणवीरवर अजनी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

घरमालकाचा झाला मृत्यू

धर्मशीला यांचा भाऊ महेंद्र डहाट (४५) वीस वर्षांपूर्वी जोशीवाडीतील जोसेफ नामक व्यक्तीच्या घरी राहत होता. त्यानंतर धर्मशीला डहाट (54) आणि जयशीला गणवीर (50) या दोन्ही बहिणी तेथेच वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहू लागल्या. महेंद्र हे जोसेफ यांची देखभाल करत होते. त्यामुळं ते घर महेंद्र यांच्या नावावर करण्याचे आश्वासन जोसेफ यांनी त्याला दिले होते. दोन मे 2021 रोजी जोसेफ यांचा मृत्यू झाला.

प्रकरण काय आहे?

जोसेफ यांचा मृत्यू झाल्यानंतर दोन्ही बहिणींना जोसेफच्या घरावर मालकी हक्क सांगायला सुरुवात केली. यावरून त्यांच्यात नेहमी खटके उडू लागले. 18 डिसेंबरला दुपारी दोन्ही बहिणींचा वाद झाला. वादाचे रुपांतर तुंबड हाणामारीत झाले. या झटापटीत धर्मशीला खाली फरशीवर पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यामुळं धर्मशिला यांचा मृत्यू झाला. महेंद्र यांनी अजनी पोलिसांत गुन्हा नोंदविला. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला. परंतु, नंतर डॉक्टरांचा अहवाल आला. त्यानंतर जयशिला यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आता चौकशीच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

 

Corona Alert | नागपुरात कोरोना बाधित दुप्पट, जमावबंदी मंगळवारपासून लागू; काय असतील निर्बंध?

Baba Amte | आधुनिक भारताचे संत बाबा आमटे; कुष्ठरोग्यांच्या जीवनात कसा फुलविला आनंद?

हिवाळी अधिवेशनात कोरोनाचा शिरकाव, समीर मेघे कोरोना पॉझिटिव्ह, अधिवेशन गुंडाळावं लागणार?