मुंबई : भाजपचे आमदार राम कदम यांनी केस न कापण्याची शपथ घेतली. राम कदम म्हणाले, माझा घाटकोपर पश्चिम हा मतदारसंघ डोंगराळ आहे. लोकसंख्या वाढली. सिंगल घराची डबल घरं झाली. अनेकांनी स्वतःची घरं पाण्याविना चालवावं लागतंय. मुंबईत महापालिकेच्या निष्काळजीपणामुळं पाण्याचा तुटवडा आहे. तसाच तुटवडा घाटकोपरच्या डोंगराळ भागात आहे. लोकं निवडून देतात. पण, तरीसुद्धा त्यांना मुबलक पाणी देऊ शकत नाही. तर मग निवडून येण्याचा उपयोग का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. डोंगरावरच्या प्रत्येक घराला मुबलक पाणी मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या डोक्याचे केस कापणार नाही, अशी शपथ घेतो.
मुंबई मनपाच्या निष्काळजीपणामुळं पाणी मिळत नाही. त्यामुळं आमचं सरकार आहे. मंत्री महोदयांचा पाठपुरावा करून घेऊन मी ते उपलब्ध करून घेणार आहे. पण, नैतिक जबाबदारी म्हणून मी ही शपथ घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
साधू संतांचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे. पण, कायदा घेतात घेऊ नये. तो कुणालाही नाही. साधू संतांची काय भूमिका आहे. हे पठाण चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता यांनी स्पष्टीकरण द्यावं. स्पष्टीकरण पारदर्शप्रमाणात दिलं तर साधू संतांमध्ये असलेला आक्रोश थांबेल.
पण, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक यांनी हलकी पब्लिसिटी हवी आहे. म्हणून ते द्यायला तयार नाहीत. कलाकार जिहादी असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यावर बोलताना राम कदम म्हणाले, साधु-संतांचा आक्रोश कशामुळं उत्पन्न झाला, याचा विचार केला पाहिजे. आक्षेपार्ह विधानांचं आम्ही कधीही समर्थन दिलेलं नाही. साधू संतांबद्दल आदर, सन्मान असल्याचंही राम कदम म्हणाले.