नागपूर : शहरात कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी झालाय. त्यामुळे शहरातील 95 टक्क्यांपेक्षा जास्त केंद्रांवर कोव्हॅक्सिनचं लसीकरण (Vaccination with covacin) ठप्प आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसतोय. बारावी आणि दहावीची (Twelfth and tenth) परीक्षा सुरू होत आहेत. कोरोनाच्या सावटाखाली ही परीक्षा होत आहे. पण कोव्हॅक्सिन लसीचा पुरेसा साठा बऱ्याच केंद्रांवर उपलब्ध नाही. 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण ठप्प झालंय. मुलांना लसीसाठी फिरावं लागतंय. अस असलं तरी विद्यार्थी परीक्षेपासून (Student exams) वंचित राहणार नाही. शिक्षण मंडळानं लसीकरण झालं नसेल तरीही परीक्षा देता येईल, असं स्पष्ट केलंय. त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही. तरीही पालकांना आपल्या पालकांचे लसीकरण झाले पाहिजे, असं वाटतं. त्यामुळं लसी उपलब्ध होणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला होता. दुसऱ्या लाटेत कोरोनाबळींची संख्या रोज शंभरापलीकडे पोहोचली होती. बाधितांची संख्या सात हजारांच्या पलीकडे होती. त्यानंतर या लाटेचा प्रकोप ओसरला. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या तिसर्या लाटेने पुन्हा रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला होता. कोरोना बळींचीही संख्या वाढली होती. त्यामुळं प्रशासनही चिंतेत होते. परंतु सोमवारी जिल्ह्यात सुमारे सव्वा महिन्यानंतर एकाही कोरोनाबळीची नोंद झाली नाही.
गेल्या चोवीस तासात नव्याने फक्त 183 कोरोना बाधितांची भर पडली. याचदरम्यान 2 हजार 409 जण ठणठणीत बरे झालेत. 2022च्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात तिसर्या लाटेतील पहिल्या कोरोनाबळींची नोंद झाली. त्यानंतर ही संख्या वाढतच गेली. जिल्ह्यात 9 जानेवारीनंतर सोमवारी सुमारे सव्वा महिन्यानंतर शून्य कोरोनाबळींची नोंद झाली. आजवर जिल्ह्यात 10 हजार 324 जणांचा कोरोनामुळे मृत्यूही झालाय. सोमवारी शहरात 3 हजार 871 व ग्रामीणमध्ये 501 अशा जिल्ह्यात 4 हजार 372 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी फक्त 183 जणांचे अहवाल सकारात्मक आढळलेत. 3 जानेवारीनंतर सोमवारी सर्वात कमी दैनंदिन बाधितांची नोंद झाली.