नागपूर : मेथी 160 रुपये किलो, फुलकोबी 120 रु. पालक 200 रु. किलो. नागपूरच्या किरकोळ बाजारात भाज्यांचे हे दर गगनाला भिडलेय. सततच्या पावसामुळे आवक कमी झाल्याने, नागपुरात सर्वच प्रकारच्या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेय. पूर आणि अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) भाजीपाला पिकाचं मोठं नुकसान (Crop Damage) झालंय. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना फटका (Farmers Hit) बसलाय. इकडे त्याचा परिणाम म्हणजे नागपुरात भाज्यांची आवक घटल्याने भाज्यांचे दर दुप्पटीनं वाढलेय. पालेभाज्या सध्या 200 रुपये किलोंच्या वर गेलेत. तर टोमॅटे, वांगी, फुलकोबी, आणि इतर भाज्यांचे दर दुप्पट झालेय. पुढील महिनाभर भाज्यांची ही दरवाढ कायम राहणार असं, भाजीविक्रेते रितेश मुडेवार यांनी सांगितलं. विदर्भात पावसानं यंदा चांगलाच कहर केलाय. आता पाऊस कमी झाला, तरी पुराचे फटके सहन करावे लागत आहेत.
भाजी | आत्ताचे दर | आठवडाभरापूर्वी |
---|---|---|
शिमला | 120 रु. किलो | 100 रु. किलो |
ढेमस | 160 रु. किलो | 80 रु. किलो |
कारली | 120 रु. किलो | 80 रु. किलो |
तुरई | 160 रु. किलो | 80 रु. किलो |
वांगी | 120 रु. किलो | 60 रु. किलो |
टोमॅटो | 60 रु. किलो | 30 रु. किलो |
फुलकोबी | 120 रु. किलो | 80 रु. किलो |
कोथिंबीर | 200 रु. किलो | 80 रु. किलो |
पालक | 200 रु. किलो | 80 रु. किलो |
मेथी | 160 रु. किलो | 80 रु. किलो |