नागपूर : नागपुरातील यशोधरानगर (Yashodharanagar), जरीपटका (Jaripatka), नवी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत बोलेरो पिकअप आणि इतर चार चाकी गाड्या चोरीला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. पोलिसांनी यासाठी तिन्ही पोलीस स्टेशनची संयुक्त टीम बनवली. तपास करत अमरावतीपर्यंत पोहचले. अमरावतीमध्ये ही गॅंग पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी सहाही आरोपीना अटक केली. त्यांचा एक साथीदार नागपुरात असल्यास पुढे आलं. त्यालाही पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 6 गाड्या मिळून आल्या. सात आरोपींपैकी तीन जण नागपुरातून गाडी चोरायचे आणि अमरावतीला घेऊन जायचे. मग अमरावती मध्ये असलेले चार जण त्यांची विल्हेवाट लावायचे. अशी माहिती डीसीपी मनीष कलवानीया (Manish Kalwania) यांनी दिली. पोलिसांनी या गॅंगचा पर्दाफाश केल्यानंतर आणखी काही गुन्हे उजेडात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यशोधरानगर, जरीपटका आणि कामठी पोलीस ठाण्याअंतर्गत गाड्यांची चोरी करणारी टोळी गजाआड झालीय. या टोळीकडून सात गुन्हे उघडकीस आणले आहेत. या सातही गुन्हांमध्ये चारचाकी वाहन बोलेरो, पीकअप व्हेईकल चोरी गेल्या होत्या. तीन गुन्हे यशोधरानगरमध्ये दाखल होते. दोन गुन्हे जरीपटका, एक नवी कामठी आणि एक पाचपावली या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. आतापर्यंत सात आरोपी अटक केले आहेत. सहा आरोपी अमरावतीचे तर एक नागपूरचा रहिवासी आहे.
अजय पठाण, महमंद मजहर, ईलीस महम्मद, नजीम खान, महम्मद अहवाज, अली शेख, वसीम परवेज अशी आरोपींची नावे आहेत. साह गाड्या आरोपींकडून जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच एक दुचाकी वाहन आणि काही मोबाईलही हस्तगत करण्यात आले आहेत. तीस लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमरावतीचे दोन आरोपी नागपुरात यायचे. नागपुरात एक असे मिळून तिघे जण वाहनांची चोरी करायचे. इतर चार आरोपी अमरावतीत गाड्यांची विल्हेवाट लावायचे.