नागपूर : उमरेड तालुक्यातील मकरधोकडा येथील सैनिक मायनिंग कंपनीला (Soldier Mining Company) वेकोलीकडून एका कामाचे कंत्राट मिळाले होते. त्या कंपनीने एमआयटी नावाच्या कंपनीला काही कामाचे कंत्राट दिले. त्या कंपनीने तक्रारदार कंत्राटदाराकडून त्याच्या दोन डोजर मशीन भाड्याने घेतल्या होत्या. कालांतराने कंत्राट रद्द झाले. यानंतर वेकोलीच्या कामावर असलेल्या दोन डोजर मशीन परत देण्याची मागणी कंत्राटदाराने केली. उपक्षेत्र व्यवस्थापक सुधांशू श्रीवास्तव (Manager Sudhanshu Srivastava) याने दोन्ही मशीन परत करण्यासाठी प्रत्येकी पंचेवीस हजार रुपये म्हणजे एकूण पन्नास हजार रुपयांची लाच मागितली. ती रक्कम अमित सिन्हा याच्याकडे देण्यास सांगितली. अमितनेही मध्यस्थी करण्यासाठी दोन हजारांची मागणी केली. याबाबत कंत्राटदाराने केलेल्या तक्रारीची दखल घेत सीबीआयने (CBI) सापळा रचला. त्यात सुधांशू श्रीवास्तव याने अधिकार्यांसमोरच पन्नास हजारांची लाच मागितली. मध्यस्थी अमितने दोन हजारांची लाच मागितली. कंपनीच्या कर्मचाऱ्याने कंत्राटदाराकडून बस्तीस हजार रुपयांची लाच घेतली. सीबीआयने दोघांनाही अटक केली.
सैनिक मायनिंगला मकरधोकडा येथील साईट तीन येथून ओव्हरबर्डन हटविण्याचे कंत्राट दिले होते. सैनिक मायनिंगने ते काम मेसर्स एमआयटीला दिले होते. एमआयटीने डोजर आणि ग्रेडर मशीन पुरवठा करण्याचे काम तक्रारदार कंपनीला दिले. कंत्राट संपल्यानंतर कामावर लावलेल्या मशीन परत करावयाच्या होत्या. त्यासाठी तक्रारदार यांनी व्यवस्थापक श्रीवास्तव यांना सिन्हाच्या माध्यमातून दोन मशीन सोडण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती.
व्यवस्थापक सुधांशू श्रीवास्तव याने स्वतः लाच घेतली नाही. त्यासाठी त्याने अमित सिन्हाला मध्यस्ती ठेवले. सिन्हाने मध्यस्ती म्हणून काम करण्यासाठी दोन हजार रुपये मागितले. शनिवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पंचासमोर दोघांनाही अटक केली. श्रीवास्तवने सिन्हाच्या माध्यमातून बत्तीस हजार रुपये घेतले. दोघांवरही लाच घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सीबीआयच्या एका पथकाने श्रीवास्तवच्या घराचीही झडती घेतल्याची माहिती आहे.