एनडीए सरकारचा शपथविधी सोहळा सध्या होतोय. यात नरेंद्र मोदी यांच्यासह एनडीए सरकारमधील मंत्री शपथ घेत आहेत. मात्र यात राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांचा समावेश नाहीये. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्रिपदावरून टोला लगवला आहे. भाजपचे नेहमीच धोरण आहे उपयोगी आहे तोपर्यंत उपभोगात आणायचं. निरुपयोगी झालं की काढून फेकायचं. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची हीच स्थिती आहे त्यांची उपयुक्तता संपली आहे. हे भाजपने ठरविलं आहे. उपयुक्तता संपली की डस्टबिनमध्ये जातात…, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
प्रभू रामचंद्राने अयोध्यामध्ये सुद्धा आशीर्वाद इंडिया आघाडीला दिला आहे. आता राष्ट्रवादी या दुखातून कसे सावरतात हे पाहावं लागणार आहे. राष्ट्रवादीचा एक खासदार आहे आणि भाजपने मॅजिक आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे हे राहिले काय आणि गेले काय त्यांना काही फरक पडणार नाही. मात्र त्यांची मजबुरी आहे. त्यांना राहावंच लागणार आहे. कारण हे इकडे परत येऊ शकत नाही आणि तिकडे दुखवू शकत नाही.धरलं तर चावते आणि पडलं तर धावतंय, अशी त्यांची अवस्था आहे, असं म्हणत वडेट्टीवार यांनी अजित पवार गटाला टोला लगावला आहे.
एका खासदारावर त्यांना मंत्रिपद कसा देतील त्यांचे जेवढे आहे ते पाहूनच देणार एक वर राज्यमंत्री पद मिळत होतं. तर त्यांनी स्वीकाराला पाहिजे होतं जो मिला ओ ही सही अशी परिस्थिती आहे. आता त्यांनी सगळ्याला घेतला आहे. सुखके सब साथी मात्र दुःखात यांच्या कोण राहील हे येणारा काळ सांगेल. जेडीयूला एकच कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री दिलं त्यांची बोळवण केली आहे. बिना पाण्याने हजामत त्यांची केली आहे. पुढे काय काय होते ते पाहू…, , असंही वडेट्टीवार म्हणाले.
आज तिसऱ्यांदा पंतप्रधान आणि भाजप शपथ घेत असताना या दोन लोकांना वाटाण्याच्या अक्षदा सहा महिन्यात लावल्या नाही. त्यांचे पक्ष फोडले नाही तर नवल वाटू नये असं मला वाटतं. आज तर सुरुवात झाली आहे काय होईल? हे कुठल्या दिशेने जातील. कारण प्रत्येकाचा अजेंडा वेगळा आहे. आरक्षणाचा विषय वेगळा आहे. हे सगळं पुढे कसं चालतं यावर आमचं लक्ष आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं आहे.