ही काय सत्यनारायणाची पूजा आहे काय?, विजय वडेट्टीवार यांचा प्रकाश आंबेडकर यांना सवाल; कशामुळे वाजलं?

| Updated on: Sep 07, 2023 | 3:59 PM

EWS चं आरक्षण न मागता दिलं होतं, मराठ्यांना त्याच धर्तीवर आरक्षण देण्यासाठी लाज वाटते का? असा सवाल देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याच बरोबर जालना येथे झालेल्या लाठी हल्ल्यासाठी गृहमंत्र्यांनी प्रायश्चित केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

ही काय सत्यनारायणाची पूजा आहे काय?, विजय वडेट्टीवार यांचा प्रकाश आंबेडकर यांना सवाल; कशामुळे वाजलं?
prakash ambedkar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बुलढाणा | 7 सप्टेंबर 2023 : इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या बैठकीला देशभरातील 28 पक्षांचे नेते आले होते. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीला निमंत्रण देण्यात आले नव्हते. ठाकरे गटाचा मित्र पक्ष असूनही प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीपासून दूर ठेवल्या गेल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही आम्हाला इंडिया आघाडीत यायचं आहे. पण त्यांना घ्यायचं नसेल तर आम्ही कसं जाणार? असा सवाल केला आहे. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीच्या बैठकीत का बोलावलं नाही यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत इंडिया आघाडीच्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलं गेलं नव्हतं. तशी माहिती स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती. मात्र इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी निमंत्रण द्यायला ही काय सत्यनारायणाची पूजा आहे का?, असा सवाल विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रकाश आंबेडकरांना केला आहे.

तर पुढच्या बैठकीचं निमंत्रण देऊ

जातीवादी शक्तींना मदत करण्याचा आंबेडकरांचा इरादा असेल तर आम्ही कितीही जोडण्याचा प्रयत्न करेल तर तो तोडण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी एक पाऊल पुढे टाकावं आणि सांगावं की त्यांना इंडिया आघाडीमध्ये यायचं आहे. आम्ही देखील पुढच्या बैठकीसाठी त्यांना निमंत्रण पाठवू असेही वडेट्टीवार म्हणालेत.

आरक्षण देण्यासाठी लाज वाटते का?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निजाम काळातील नोंदीच्या आधारे मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र यावर विरोधी पक्षनेते विजय यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी नवीन असं काहीही केलेलं नसून जुन्या बाटलीला नवीन लेबल लावल असल्याचं वडेट्टीवार म्हणालेत.

तुमची नियत असेल तर…

विरोधकांनी मराठा आरक्षणाच्या आडून राजकारण करू नये, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या विधानावर वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिल आहे. राजकारण आम्ही नव्हे तर तुम्ही करत आहात. त्यावेळी 28 पैकी 18 लोक आमच्याबरोबर होते. तेव्हा तुम्ही झोपला होतात का? तेव्हा तुम्हाला कोरोना झाला होता का?, असा सवाल त्यांनी केला. आरक्षण द्यायची तुमची नियत असेल तर झटक्यात प्रश्न सुटेल, असंही ते म्हणाले.