नागपूर : अधिवेशनात प्रश्न मार्गी न लागल्याने महाविकास आघाडीतील आमदारांमध्ये नाराजी आहे. विधानसभेत लक्षवेधी न लागल्याने काँग्रेस आ. विकास ठाकरे (Congress Vikas Thackeray) संतप्त झालेत. तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घ्यायची का, असा सवाल काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना ( Assembly Speaker) विचारला. मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या विभागातील घोटाळा आणि नागपूर मनपातील स्टेशन घोटाळ्याची लक्षवेधी लागली नाही. पंधरा दिवस पाठपुरावा करून लक्षवेधी लागत नाही. आम्ही फक्त सही करायला सभागृहात येतो का, असंही आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांना विचारलंय. नागपूर मनपातील स्टेशनरी घोटाळ्यात (Nagpur Municipal Station Scam) अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे.
स्टेशनरी घोटाळ्यानंतर अजय आंबेकर नावाचा व्यक्ती व्हालंटरी रिटायरमेंट घेऊन फरार झाला आहे. सभापती महोदय तुमच्याकडे मागील पंधरा दिवसांपासून लक्षवेधी लावण्यासाठी येत आहे. कालसुद्धा मी येऊन भेटलो. परंतु, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्याकडं लक्ष दिलं जात नाही. या घोटाळ्यात शासनाचे पैसे गेले. शासनाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. अनेक अधिकारी या घोटाळ्यात लिप्त आहेत. याची लक्षवेधी आपण लावत नाहीत. इथं चाललंय काय, असा सवाल विकास ठाकरे यांनी विचारला.
West Nagpur MLA Vikas Thakre questioned whether he should hold presser against CM. Govt is not taking action in NMC Bogus Contracts Scam & Foreign Tour Scam so he submitted 2 LAQs which too not taken in assembly so he also said alleged Thane legislators’ LAQs being entertained. pic.twitter.com/dZyp0rTMcq
— Anjaya Anparthi (@anjayaaTOI) March 25, 2022
नाशिकच्या आमदारांच्या लक्षवेधी कशा लागतात
आमदार विकास ठाकरे म्हणाले, इथं लक्षवेधी नाशिक जिल्ह्यातील आमदारांच्या किती लक्षवेधी लागल्या. घोटाळ्यात शासनाचं नुकसान झालं आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. याकडं लक्ष दिलं जात नाही. अशा लक्षवेधीकडं आपण लक्ष द्यावं. यासंदर्भात आपण आपल्या कक्षात बैठक घ्यावी. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी विकास ठाकरे यांनी सभागृहात मांडली. यावर या विषयावर बैठक घेतो, असं आश्वासन विधानसभा अध्यक्षांनी दिले.