नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, गोसेखुर्द 1 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आले. टेक्स्टाईल पार्क आले. मदर डेअरीसाठी चालना मिळेल. चार वर्षात विदर्भाचं चित्र बदलेल. यावर बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री यांनी सभागृहात फुगवून आकडे सांगितले आहेत. अधिवेशन एक आठवडा वाढवावा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली. कापूस उत्पादक शेतकरी आहे. कापसासाठी काय केलं, असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला. वाशिम, बुलढाणा विदर्भात नाही का?, असा प्रश्नही मिटकरी यांनी उपस्थित केला.
धर्माचं नाव घेऊन 25 ग्राम फुलवाती 40 रुपयांत विकत आहेत. त्यानुसार क्विंटलला दीड लाख भाव मिळतो. त्यातून निदान 15 हजार रुपये भाव शेतकऱ्यांना द्यावा. आताचा काळात भाव दिला जाऊ शकत नाही, असे उपमुख्यमंत्री फडणवीस सांगतात. रामदेवबाबांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. पण आमचा माय बाप शेतकरी आत्महत्या करत आहे. चित्र पालटलं असे उपमुख्यमंत्री म्हणाले. आमच्या शेतकऱ्यांना आधार द्यावा एवढी माफक अपेक्षा आहे, असंही मिटकरी यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री रेशीमबागमध्ये गेल्यावर आस्था बदलली का? शेतकऱ्याला काहीही मिळाले नाही. रामदेवबाबा मालामाल केलं जातं आहे. असा आरोपही अमोल मिटकरी यांनी केला. पीक विमा कंपन्यावर सरकारचे नियंत्रण नाही. शेतकऱ्यांची थट्टा चालवली जात आहे. त्यांना जाब विचारून कायदा करून कारवाई झाली पाहिजे, असंही त्यांनी म्हंटलं.
करणी सेना वारंवार चिथावणी देणारे वक्तव्य करत आहे. अकलेचे तारे तोडणारे वक्तव्य आहेत. आमचा पूर्वजांचा शौर्य स्तंभ आहे. महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचं काम करू नये. अजय सेंगरवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणीही मिटकरी यांनी केली.