समीर भिसे, Tv9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) कंपनीला जागा देण्याचा करार झाला नाही, अशी माहिती समोर आली. ही माहिती खरी असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितलं. ते म्हणाले, केवळ नौटंकी चाललेली आहे. आमचं सरकार आल्यावर आम्ही जागा दाखविली. तत्पूर्वी त्यांना जागाही दाखविली नव्हती. कॅबिनेटची मिटिंगही झाली नव्हती. आम्ही कॅबिनेट उपसमितीची मिटिंग घेतली.
आमच्या लक्षात की,हे गुजरातला चालले आहेत. तेव्हा मी आणि मुख्यमंत्री आम्ही त्यांना पत्र लिहिली. मी स्वतः दोनदा जाऊन भेटलो. आम्ही सांगितलं गुजरातपेक्षा जास्त चांगलं पॅकेज देतो. पॅकेज हे कॅबिनेटची मंजुरी करून दाखविलं. हे पॅकेज आम्ही तुम्हाला देतो आहोत. जागा आम्ही निश्चित केली. हे सगळं आमच्या काळात झालं आहे, असं फडणवीस यांनी सविस्तर सांगितलं.
महाविकास आघाडीच्या काळात काहीचं झालं नाही. हे तिकडं जाऊन नौटंकी करतात. आंदोलनं करतात. पण, त्यांना तसंच उत्तर आम्ही निश्चितपणे देऊ. त्याचं उत्तर त्यांच्यापेक्षा जास्त गुंतवणूक आणून देऊ.
वेदांताची चर्चा आता गुजरात सरकारशी करण्यात काहीही अर्थ नाही. ज्या ज्या राज्यात चांगली कामं आहेत, ते मंत्र्यांनी बघून यायचं.
गुजरातमध्ये डॅश बोर्ड तयार केला आहे. संपूर्ण प्रकल्पाची माहिती त्याद्वारे मिळते. तसं डॅश बोर्ड किंवा त्याहीपेक्षा चांगलं डॅश बोर्ड आणाण्याचा प्रयत्न करू. प्रकल्पांवर नजर ठेवता येते. त्यामधील दिरंगाई दूर करता येते.
हरियाणामध्ये परिवार पहचान पत्र नावाची योजना तयार केली. त्यामध्ये एखाद्या परिवाराच्या लोकांना वेगवेगळ्या योजनांची माहिती मिळते. युवक, वृद्धांसाठी काय योजना देता येतील, याचा विचार करता येईल. एक टीम तिथं जाऊन याचा अभ्यास करणार आहे, असंही फडणवीस यांनी सांगितलं.