गोंदिया : 25 जानेवारी रोजी वर्धा येथे कार अपघात (Car accident at Wardha) झाला. या अपघातात 7 विद्यार्थी डॉक्टरांचा मृत्यू झाला. या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी दिले. हा अपघात नेमका कशामुळे झाला. रोड इंजिनिअरिंगचे कारण आहे की आटोमोबाईल इंजिनिअरिंगचे की, इतर कारणे आहेत, याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील आमदार विजय रहांगडाले (MLA Vijay Rahangdale) यांच्या मुलाच्या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या घरी सांत्वन देण्यासाठी नितीन गडकरी आले होते. यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, देशात वर्षाला 5 लाख अपघात होतात. 3.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. रस्त्याच्या सुरक्षा नियमाचे सजकतेने पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कर्नाटकमध्ये रस्ता अपघात आणि मृत्यू 50% कमी केले आहेत, अशी माहितीही गडकरी यांनी दिली.
देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ मेडिकल विद्यार्थ्यांच्या कारचा पंचेवीस जानेवारीला अपघात झाला. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली. तब्बल 40 फूट उंचीवरुन विद्यार्थ्यांची कार खाली पडल्याने सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला. या अपघातात तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश होता. सर्व मेडिकलचे विद्यार्थी असून ते एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. वेगवेगळ्या वर्गात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांची कार नदीच्या पुलावरुन चाळीस फूट खोल दरीस कार कोसळून अपघात झाला होता. नीरज चौहान हा कार चालवत होता. त्याचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जातंय. आपला मुलगा भविष्यात डॉक्टर होणार आहे, असं स्वप्न सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिलं होतं. मात्र या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. या अपघातानंतर विद्यार्थ्यांचा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठीही तब्बल चार तासांचा अवधी लागला.
Photo | कार थेट तब्बल 40 फूट खोल कोसळली, गाडीतलं कुणीच वाचलं नाही, सातही जणांचा जागीच मृत्यू!