नागपूर : थंडी सुरू झाली की, परदेशी पक्षी विदर्भातील तलावांवर (lakes) येतात. पक्ष्यांच्या ( birds) प्रजननासाठी हा काळ चांगला असतो. पक्षी विदर्भातील महत्त्वाच्या तलावांवर येतात. परदेशी पाहुणे असल्यानं तलावही त्यांचे स्वागत करतात. पण, शिकारीसाठी काही तलावांवर जाळे मांडले जातात. तर काही तलावांवर मासेमारीसाठी जाळे मांडले जातात. या जाळ्यात अडकलेले पक्षी शिकार ठरतात. तसेच प्लास्टिकचा (plastics) होणारा अतिरेकी वापर या पक्ष्यांच्या जीवावर उठला आहे. पक्षी अभ्यासकांनी तलावांचे निरीक्षण केले. पक्ष्यांच्या किलबिलाटाने तलाव फुललेली त्यांनी दिसली. पण, तलाव परिसरात पसरलेला प्लास्टिकचा कचरा तसेच मांडलेले जाळे हे या परदेशी पाहुण्यांच्या जीवावर उठले आहेत.
नागपूर जिल्ह्यात तीनशेच्या जवळपास तलावं आहेत. तर तलावांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदियात आठशे आणि भंडाऱ्यात सातशे तलाव आहेत. या तलावांवर मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. तसेच काही पानथळ जागा आहेत. या पानथळ जागेवर मासे, किडे खाण्यासाठी किडे गर्दी करतात. हे पक्षी जाळ्यांमध्ये अलगत अडकतात. कारण मासे पकडल्यानंतर जाळे तसेच काठावर फेकून दिले जाते. शिवाय तुटलेले जाळेही असेच फेकले जाते. या ठिकाणी परदेशी पाहुणे अडकतात. मग, अडकेल्या पक्ष्यांना खाणारे शौकीन कापून खातात.
पर्यटनासाठी तलावाशेजारी जाणारे प्लास्टिक पॉलिथीन, रॅपर्स, प्लास्टिक पिशव्या तशाच फेकून देतात. तसेच रस्त्यावर फेकलेली प्लास्टिक पावसाळ्यात तलावात वाहून जाते. त्यामुळं तलावात प्लास्टिकचा कचरा पडलेला दिसून येतो. पक्षी जमिनीवर सुरक्षित ठिकाणी अंडी देतात. खाली प्लास्टिक असल्यास अंडी आणि पिल्लांनाही प्लास्टिकचा धोका संभवतो.
वनविभागाच्या तलावात मासेमारी करू दिली जात नाही. तलाव स्वच्छ केले जातात. त्यामुळं वनविभागाच्या तलावात पक्षी सुरक्षित असतात. तलावांचे नियंत्रण हे पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडं असते. तलाव परिसरात प्लास्टिक राहता कामा नये, याची खबरदारी मासेमारांनी घेतली पाहिजे. म्हणजे तलावांची स्वच्छता होईल. नागपूर जिल्ह्यात दरवर्षी हजाराच्या वर पक्षी मरतात. अशा अनुचित घटना होणार नाही, असं पक्षीनिरीक्षकांना वाटते.