गजानन उमाटे, प्रतिनिधी, नागपूर : राज्यातील जनतेसाठी चिंता मिटवणारी एक चांगली बातमी आहे. कडाक्याच्या उन्हात पाण्याची मागणी वाढली असताना राज्यातील सर्व धरणांमध्ये सध्या एकूण ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी येवढाच पाणीसाठा सध्या धरणांमध्ये आहे. पावसाळ्यापर्यंत पुरेसा इतका पाणीसाठा सध्या राज्यातील धरणांमध्ये आहे. त्यामुळेच सध्या राज्यात पाणीटंचाईची चिंता नाही. सध्या नागपूर विभागातील मोठे, मध्यम आणि लहान धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर कोकण विभागातील धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा पाणीसाठा शिल्लक आहे.
अमरावती विभागातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा, तर औरंगाबाद विभागात ३६ टक्के आणि नाशिक विभागातील धरणांमध्ये ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या उन्हाळ्यातंही यावेळेस धरणांमध्ये ३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक होता.
यावेळेसही राज्यातील सर्व लघू, मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये ३२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली तरिही, पावसाळ्यापर्यंत महाराष्ट्राला पुरेसा येवढा पाणीसाठा धरणांमध्ये असल्याने पाणीटंचाईची चिंता नाही.
राज्याच्या जलसंधारण विभागाच्या माहितीनुसार पुणे विभाग सोडल्यास राज्यातील इतर विभागातील धरणांमध्ये सध्या पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. नागपूर विभागातील धरणांमध्ये ४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कोकण विभागातील धरणांमध्ये ३७ टक्के पाणीसाठा, तर अमरावती विभागातील धरणांमध्ये ४१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. शिवाय पुणे विभागात २३ टक्के पाणीसाठा असल्याने थोडी चिंता आहे. परंतु, राज्यातील विचार करता यंदा पाणीचंटाई नाही, असेच म्हणता येईल.
विभाग धरणातील पाणीसाठा
अमरावती – ४१ टक्के
कोकण – ३७ टक्के
नागपूर – ४० टक्के
नाशिक – ३४ टक्के
पुणे – २३ टक्के
औरंगाबाद – ३६ टक्के