नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नावे तीन वेळा दाऊद इब्राहिमच्या नावे फोन करण्यात आला. खंडणी दिली नाही, तर जीवे मारण्याची धमकी (Threat Call) गडकरी यांना देण्यात आली. नागपुरातल्या गडकरी यांच्या कार्यालयात तीन वेळा फोन आल्यानं चांगलीच धावपळ उडाली. सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. पोलिसांनी तपासाची चक्र फिरविली आणि नितीन गडकरी यांना शोधून काढलं. नितीन गडकरी यांना धमकीचा हा फोन चक्क जेलमधून करण्यात आला होता.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार्यालयातील धमकी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. बेळगाव जेलमध्ये असलेल्या आरोपीने कॉल केल्याचं निष्पन्न झाले. पोलीस आयुक्त म्हणाले, आमची टीम तिथे पोहचली आहे.
जयश कानथा नावाचा आरोपी आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्याने जेलमधून फोन केला आहे. त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असल्याची माहिती आहे. तो जेलमधून पळाला होता, अशीसुद्धा माहिती पुढे येत आहे.
त्याच्याकडून एक डायरी जप्त केली आहे. त्यावरून तपास सुरू आहे. त्यात अनेकांचे नंबर असल्याचं पुढे येत आहे. दाऊदच्या नावाने फोन केला हे बरोबर. तो फाशीचा आरोपी असताना सुद्धा जेलमधून त्याने फोन केला, ही बाब गंभीर आहे.
कर्नाटक पोलीस या संदर्भात तपास करत सगळ्या संबंधित एजेंशी आपल्या परीने तपास करत आहेत. आम्ही कर्नाटक पोलिसांच्या संपर्कात आहोत.
तपास प्राथमिक स्टेजवर आहे. त्याने धर्मपरिवर्तन केलं आहे, हेसुद्धा पुढे येत आहे. मात्र तपासात ते स्पष्ट होईल, असं नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं.