नागपूर – नागपूर विधीमंडळ परिसरात असलेलं शिवसेनेचं पक्ष कार्यालय नेमकं कुणाचं? आगामी हिवाळी अधिवेशनात पक्ष कार्यालयात ठाकरे गट बसणार, की शिंगे गट? यावरुन पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. १९ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे. या अधिवेशनासाठी प्रत्येक पक्षाचे कार्यालय सज्ज होत आहे. पण शिवसेनेचं कार्यालय शिंदे गटाला, की ठाकरे गटाला याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. सध्या तरी प्रशासनाने या कार्यालयाचा बोर्ड कापडाने झाकून ठेवलाय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडानंतर ‘शिवसेना’ कुणाची हा वाद सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असे नाव मिळाले आहे.
पण आगामी हिवाळी अधिवेशनात नागपूर विधिमंडळ परिसरात असलेलं शिवसेनेचं पक्ष कार्यालय नेमकं कुणाचं? यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. सध्या तरी प्रशासनाने या कार्यालयाचा बोर्ड कापडाने झाकून ठेवलाय.
नागपूर विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयावरून वाद होण्याची शक्यता आहे. शिवसेना कार्यालय कुणाला मिळणार याकडं आता सर्वांचचं लक्ष लागलंय.
नागपूर अधिवेशनात शिवसेनेचं पक्षकार्यालयं नेमकं कुठल्या गटाचं, यावरून वाद होण्याची शक्यता आहे. विधानभवन परिसरात अधिवेशनाची तयारी सुरू आहे. शिवसेनेच्या पक्षकार्यालयावरून वाद आहेत.
त्यामुळं प्रशासनानं हा पक्ष कार्यालयाचा बोर्ड झाकून ठेवलाय. हे पक्ष कार्यालय ठाकरे की शिंदे गटाला मिळणार, यावरून वाद होण्याची शक्यता आहे. दोन्ही गट वेगळे झालेत. परंतु, कार्यालय सज्ज करत असताना आता प्रशासनानं हा बोर्ड झाकून ठेवलाय.