समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन

| Updated on: Dec 10, 2022 | 11:03 PM

नागपूर-मुंबई अशा भव्य समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतंय.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन
उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

नागपूर : नागपूरमध्ये समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण झाली. पण, त्याआधी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही सवाल केलेत. महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादावरून आधी भूमिका मांडा. नंतर उद्घाटन करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अरेरावीबद्दल तुम्ही बोललंचं पाहिजे. महाराष्ट्र तुमच्या सीमाप्रश्नावरील भूमिकेची वाट बघतोय. मोठ्या महामार्गाचं उद्घाटन करत असताना कर्नाटक सीमावादावर तुम्ही काय बोलणार आहात ते आधी बोला नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं असलेल्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करा, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं.

त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्यूत्तर दिलं. ते म्हणाले, १६ आमदार असलेल्या पक्षानी अडीच हजार आमदार असलेल्या पक्षाच्या पंतप्रधानांना सांगायचं. ज्यांनी आता दीडशेच्यावर आमदार जिंकले. अशा १६ आमदाराच्या पक्षाचं तत्वज्ञानाकडं कोण लक्ष देतं.

समृद्धी महामार्गाचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आणि त्यानंतर नागपुरातल्या मेट्रो 2च्या उद्घाटनासाठी मोदी नागपुरात येत आहेत. त्यासाठी जय्यत तयारीही झालीय. पण समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाआधीच इकडे औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चानं उद्घाटन केलं. राज्यपाल कोश्यारींवर कारवाई होत नसल्यानं मराठा क्रांती मोर्चानं आपला रोष व्यक्त केला.

नागपूर-मुंबई अशा भव्य समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतंय. महाराष्ट्राच्या विकासाच्यादृष्टीनं याकडे गेमचेंजर म्हणून पाहिलं जातंय. आता उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी काय बोलतात, याकडेही नजरा असतील.

मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या साहित्य संमेलनातून उद्धव ठाकरे यांनी राजकीय टीकाटीपण्णी केली. पंतप्रधानांनी पालक म्हणून बोलावं. पण, महाराष्ट्राला पालकाची भाजी समजू नका, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.