राज्यपालांची वृद्धावस्था काढणं हीच संस्कृती बाळासाहेबांनी शिकवली का, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका कुणावर?

| Updated on: Nov 24, 2022 | 8:46 PM

संजय राऊत हे आमदारांना आज रेडे म्हणत आहेत. जेव्हा तिकीटा दिल्या तेव्हा ते शिवसैनिक होते.

राज्यपालांची वृद्धावस्था काढणं हीच संस्कृती बाळासाहेबांनी शिकवली का, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका कुणावर?
चंद्रशेखर बावनकुळे
Follow us on

नागपूर – भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे होते. त्यांनी आता काही बोलणे म्हणजे विनोद केल्यासारखे आहे. राज्यपालांबद्दल उद्धव ठाकरे यांनी असं बोलणे योग्य नाही.  राज्यपाल यांना अशा पद्धतीने कोणी टीका करत नाही.  त्याचा आक्षेपार्ह वक्तव्याचे कोणीही समर्थन करत नाही. पण राज्यपाल यांची वृद्धावस्था काढणं, बाळासाहेब ठाकरे यांनी हीच संस्कृती शिकवली का? , असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला. व्यक्तिगत टीकाटिप्पणी करू नका. हे महाराष्ट्राला शोभन्यासारखे नाही, असंही ते म्हणाले.

खर तर हुकूमशाही पद्धतीने आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी सरकार चालले. नवीन सरकार चांगले काम करत असल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे.

संजय राऊत हे आमदारांना आज रेडे म्हणत आहेत. जेव्हा तिकीटा दिल्या तेव्हा ते शिवसैनिक होते. ते बाहेर पडले म्हणून आता रेडे कसे झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

खुर्ची गेल्याने अस्वस्थ झाल्याने राग व्यक्त करत आहेत. सरकार गेल्यामुळे ते सगळे अस्वस्थ आहेत. त्यामुळे कुठला ना कुठला विषय घेऊन ते आपला राग व्यक्त करतात, असं मला वाटतं, असंही त्यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोणी काय करावे, हा त्यांचा  वैयक्तिक अधिकार आहे. त्यांनी कसं वागावं. कुठं जायचं हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. शरद पवार यांच्याकडून वैयक्तिक टीकेची अपेक्षा नाही. राज्यपालांवर वक्तव्य करून त्यांनी आपली प्रतिमा खराब केली आहे.

राज्यपालांनी अडीच वर्षांमध्ये खूप चांगले काम केले. ते तुम्ही सगळे विसरले का. बोलण्यामध्ये काहीतरी आक्षेपार्ह  आलं आणि हा प्रश्न निर्माण झाला. या विषयाचं समर्थन कोणी करणार नाही. मात्र  त्यांनी मागील काळात  केलेलं काम बघीतलं पाहिजे, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.