नागपूर : जिल्ह्यातील नांदगाव येथे राखेमुळं प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळं स्थानिक, सामाजिक संस्था आणि स्टेकहोल्डरर्स यांची बैठक बोलावली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board) यावर नियंत्रण कसं मिळविता येईल, यावर उपाय शोधणार आहे. असं ट्टिट राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी आज सकाळी केलंय. आदित्य ठाकरे हे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर येणार होते. परंतु, काही कारणास्तव विदर्भात येऊ शकले नाहीत. त्यामुळं त्यांनी ऑनलाईन बैठक बोलाविली. कोराडी आणि खापरखेडा वीज केंद्रातून (Koradi and Khaparkheda power stations) मोठ्या प्रमाणात फ्लाय अॅश तयार होते. त्याची विल्हेवाट लावण्याचे मोठे आव्हान आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नांदगाव येथील फ्लाय अॅश टाकण्यास प्रतिबंध केलाय. तरीही त्यांच्या समस्या कायम आहेत. त्या सोडविण्यासाठी ही बैठक बोलाविल्याचे आदित्य ठाकरे यांनी टि्वट केलंय.
कोराडी, खापरखेडा वीज केंद्रातील प्रदूषणामुळं परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. राखेच्या प्रदूषणामुळं श्वसनाचे आजार झाले आहेत. पाणी दूषित आहे. झाडांची योग्य वाढ होत नाही. त्यामुळं पिकं घेणं कठीण झालंय. नदीचे पाणीही प्रदूषित झालंय. याचा त्रास जनावरांनाही होत आहे. या बद्दल नांदगाव येथील नागरिकांनी तसेच सामाजिक संस्थांनी पर्यावरण विभागाकडं तक्रारी केल्या होत्या. सध्या नांदगाव येथे राख फेकण्यावर निर्बंध आणण्यात आलंय. तरीही राखेपासून होणारे दुष्परिणाम कायम आहेत. ते कसे कमी करता येतील, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ उपाय शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळं गावकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
After multiple complaints from Nagpur residents on fly ash dumping at Nandgaon village, I held meeting with stakeholders, locals &NGOs to understand pollution impact& requested Maharashtra Pollution Control Board to immediately rectify the issue: Maharashtra Min Aaditya Thackeray pic.twitter.com/1oLMtdIIX1
— ANI (@ANI) February 8, 2022
आरोग्य विषयक सुविधा देण्याची मागणी
कोराडी, खापरखेडा येथे कोळशापासून वीज तयार केली जाते. कोळशा जळल्यानंतर राख उरते. ही राख बाजूच्या परिसरात फेकली जाते. या राखेमुळं अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळं राखेची योग्य विल्हेवाट लावावी. तसेच परिसरातील नागरिकांनी आरोग्य विषयक सुविधा द्याव्यात, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.