नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे रोजगार घेणारे नव्हे देणारे बना, असं नेहमी भाषणात सांगतात. त्यांनीसुद्धा आपल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बऱ्याच लोकांना रोजगार दिला आहे. फॉरचून फाउंडेशनच्या युथ एम्पॉवरमेंट समिटच्या समारोपीय कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ३१ मार्चला इंफोसिसचे उद्घाटन करणार आहे. तिथं पाच हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. एससीएलने ७ हजार तरुणांना रोजगार दिला. टीसीएसने सात हजार लोकांना रोजगार दिला. ३० हजार लोकं आपल्याकडं अपॉइंट करणार आहेत. आतापर्यंत मिहानमध्ये ८७ हजार ८९० लोकांना रोजगार मिळाला आहे. पुढच्या निवडणुकीआधी मिहानमध्ये एक लाख रोजगार मिळेल, असा संकल्प केला आहे.
मेट्रोने १३ हजार २२३ लोकांना रोजगार दिला. बुटीबोरी एमआयडीसीत ११ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. आपल्या भागाचा विकास करायचा असेल, तर रोजगार निर्माण झाला पाहिजे. रोजगार निर्माण झाल्यास गरिबी दूर होणार आहे. उत्पन्न वाढेल. नागपूर, विदर्भ समृद्ध, संपन्न होणार आहे.
अनिल सोले यांच्या मार्गदर्शनाखी युथ एम्पॉवरमेंट समिटचे आयोजन करण्यात आलं. अनेकांनी त्यात काम केलं. फाउंडेशनच्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो. नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा झालो पाहिजे, असं गडकरी यांनी सांगितलं. या समिटमध्ये राजेंद्र निंबोरकर, नागो गाणार, राजेश बागडी, भोलानाथ सहारे आदी उपस्थित होते.
ड्रोनच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती होतं आहे. त्यामुळे तो दिवस दूर नाही की चार जण ड्रोनमध्ये बसून विमानतळावर जातील, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत. आज शेतीचे फवारणी असो, पहाडावरून 200 किलोच्या ड्रोनच्या साह्यानं सफरचंद खाली आणणे असो. यासारखी अनेक काम ड्रोनमुळे कमी पैशात होत आहे. त्यामुळे भविष्यात ड्रोनच्या क्षेत्रात प्रगती होऊन चार माणसं बसून काही अंतरावर सहज जाऊ शकतील, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणालेत.
नागपुरात मिहानमध्ये 31 मार्चला इन्फोसिसच उदघाटन करणार आहे. त्यातून 5 हजार जणांना रोजगार मिळणार आहे. मिहानच्या माध्यमातून 87 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. पुढील निवडणुकीला समोर जाण्यापूर्वी 1 लाख लोकांना मिहानमध्ये रोजगार मिळेल. असा संकल्प असल्याचं केंद्रीय मंत्री गडकरी यावेळी बोलताना म्हणालेत.