नागपूर कारागृहातील झडतीत गुंडाकडे सापडल्या होत्या तार, टॅबलेट्स; जेलरने खरटपट्टी काढल्याने चिडून केला हल्ला

| Updated on: Feb 23, 2022 | 9:44 AM

मला का झापले म्हणून कैद्याने तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला केला. यात दोघांचीही सोमवारी चांगलीच झटापट झाली. तुरुंगातील या घटनेने पोलीस प्रशासन हादरले. गुंड गेल्या सात वर्षांपूर्वी जेल ब्रेक करून गेला होता. तो गूंड प्रवृत्तीचा असल्यानेचं त्याने ही हिंमत केली.

नागपूर कारागृहातील झडतीत गुंडाकडे सापडल्या होत्या तार, टॅबलेट्स; जेलरने खरटपट्टी काढल्याने चिडून केला हल्ला
नागपुरातील मध्यवर्ती कारागृह
Follow us on

नागपूर : नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात (Nagpur Central Jail) हेमंत गोविंदराव इंगोले (वय 32) हे तुरुंग अधिकारी आहेत. आरोपी शोयब सलीम खान हा राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यातील (Ranapratapnagar Police Station) गुन्ह्यात कारागृहात आहे. 17 फेब्रुवारी हेमंत इंगोले हे नियमित झडती घेत होते. त्यांना शोएब सलीम खान याच्या खोलीतून काही औषधी सापडली. एक सात ते आठ इंच लांबीची टोकदार तार (Angled Wire ) सापडली. हेमंत इंगोले यांनी हे सर्व जप्त केले. त्यानंतर हे सर्व तुझ्याकडे कसे आले यावरून झडती घेतली. शोयबला चांगलेच गरम केले. त्यामुळं शोयबचा तिळपापड झाला. त्यामुळं तो इंगोले यांच्यावर चांगलाच चिडून होता.

मला का झापले म्हणून केला हल्ला

या कारणावरून सोमवारी, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास इंगोले हे कारागृहातील सर्कल आफिसच्या बाहेर कार्यालयीन कामकाजाकरिता गेले होते. त्यावेळी शोयबने इंगोले यांच्यावर हल्ला केला. इंगोले यांना हातबुक्कीने मारहाण केली. झटापट करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. इंगोले यांचे सहकारी कर्मचारी यांनी मध्यस्ती केली. शोयबला आवरले. यावेळी दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. त्यानंतर शोयबची धुलाई करण्यात आली. कारागृह प्रशासनातर्फे अधीक्षक अनुप कुमरे यांनी चौकशी केली. त्यानंतर इंगोले यांनी धंतोली पोलिसांत तक्रार नोंदविली. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर शोयबलाही दुखापत झाली. त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी उपयार करत आहेत.

शोयब सात वर्षांपूर्वी जेलमधून पळाला होता

सात वर्षांपूर्वी मध्यवर्ती कारागृहाची भक्कम तटबंदी तोडून चार साथीदारांसह शोयब पळून गेला होता. त्याच्यासोबत नेपाली खत्री, राहुल गुप्ता, बिशनसिंग उके आणि आकाश ठाकूर यांनीही पळ काढला होता. 31 मार्च 2015 च्या पहाटे हे चारही गुंड पळून गेले होते. या जेलब्रेक प्रकरणने खळबळ उडवून दिली होती. दीड महिन्यांनंतर शोयबला अटक करण्यात आली होती. त्यानंतर इतर आरोपीही जेरबंद झाले होते. 24 डिसेंबर 2019 या या पाचही आरोपींना न्यायालयाने प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास ठोठावला होता. अन्य काही गुन्हातही शोयब कारागृहात आहे.

नागपूर कारागृहात गुंडाचा जेलरवर हल्ला, तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडून कैद्याची धुलाई

उद्योजक होण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी सुवर्णसंधी, नागपुरात केव्हापर्यंत करता येणार अर्ज

पर्यटनाला केव्हा येणार चांगले दिवस?, नागपुरातील पर्यटकांचे जंगल सफारीला प्राधान्य